आधार लिंक नसेल तर पॅन कार्ड बंद, मुदत संपत आली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:50 AM2022-03-31T07:50:20+5:302022-03-31T07:50:46+5:30

पॅन कार्ड आधारशी जोडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे

If there is no Aadhaar link then PAN card is closed | आधार लिंक नसेल तर पॅन कार्ड बंद, मुदत संपत आली

आधार लिंक नसेल तर पॅन कार्ड बंद, मुदत संपत आली

googlenewsNext

नवी दिल्ली : ३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न करणाऱ्या करदात्यांना ५०० ते १००० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल, असे आयकर विभागाने म्हटले आहे.

पॅन कार्ड आधारशी जोडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. अंतिम मुदतीचे पालन न केल्यास पॅन निष्क्रिय होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अधिसूचनेत म्हटले आहे  की आधार पुढील ३ महिन्यात किंवा ३० जून २०२२ पर्यंत लिंक न झाल्यास ५०० रुपये विलंब शुल्क आकारले जाईल. त्यानंतर, करदात्यांना दंड म्हणून १ हजार रुपये भरावे लागतील. आधारशी पॅन लिंक न केल्याने ३१ मार्च २०२२ नंतर पॅन निष्क्रिय होईल. दंड भरल्यानंतर ते कार्यान्वित केले जाऊ शकते, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

Web Title: If there is no Aadhaar link then PAN card is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.