दहशतवादाशिवाय दुसरा मुद्दा आल्यास पाकशी चर्चा नाही- सुषमा स्वराज

By admin | Published: August 22, 2015 05:19 PM2015-08-22T17:19:16+5:302015-08-22T18:38:34+5:30

भारत व पाकदरम्यान एनएसए स्तरावर दहशतवाद या एका मुद्याशिवाय इतर कोणत्याही मुद्यावर (हुर्रियत नेते व जम्मू-काश्मीर) बोलायचे असल्यास पाकशी चर्चा होणार नाही, असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.

If there is no other issue than terrorism, then there is no discussion with Pakistan - Sushma Swaraj | दहशतवादाशिवाय दुसरा मुद्दा आल्यास पाकशी चर्चा नाही- सुषमा स्वराज

दहशतवादाशिवाय दुसरा मुद्दा आल्यास पाकशी चर्चा नाही- सुषमा स्वराज

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ -  भारत व पाकिस्तानदरम्यान एनएसए स्तरावर दहशतवाद या एकाच मुद्यावर चर्चा होऊ शकते, इतर कोणत्याही मुद्यावर (हुर्रियत नेते व जम्मू-काश्मीर) चर्चा करायची असल्यास दोन्ही देशांदरम्यान ही चर्चा होणार नाही, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला सुनावले आहे. भारताने पाकिस्तानसमोर कोणतीही अट ठेवली नसून दोन्ही देशांदरम्यान होणारी ही चर्चा शिमला व उफा करारानुसारच होईल असे स्पष्ट करत भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे केवळ आजची रात्र असल्याचे सांगितले असून आता पाकिस्तान यावर काय भूमिका घेते, सरताज अझिज भारतात येतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
२३ ऑगस्ट रोजी भारत पाकदरम्यान एनएसए स्तरावर चर्चा होणार असून काश्मीरचा मुद्दा वगळून दोन्ही देशांदरम्यान चर्चा होऊ शकत नाही असे पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज दुपारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेत आपण चर्चेसाठी पाकिस्तानचे स्वागत करतो, त्यांच्यासमोर कोणतीही अट ठेवली नसून सिमला व उफा करारांनुसारच चर्चा होईल असे सांगितले. 'उफा' येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार चर्चेतील अडथळा दूर करण्यासाठी दहशतावादाच्या मुद्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अझिज यांचे आम्ही स्वागत करतो, पण भारताशी चर्चेआधी त्यांनी हुर्रियतच्या नेत्यांची भेट घेणे हे 'सिमला' कराराचे उल्लंघन असल्याने आम्ही त्या भेटीला विरोध करतो. 'सिमला' करारानुसार भारत-पाकिस्तान चर्चेदरम्यान हुर्रियत किंवा इतर कोणालाही तिसरी पार्टी बनवू नका. ही चर्चा दोन देशांमध्येच झाली पाहिजे असे स्वराज म्हणाल्या. भारत-पाकदरम्यान होणारी चर्चा टाळण्यासाठी पाक प्रयत्न करत आहे, असा आरोपही स्वराज यांनी केला.
जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर चर्चा करण्यापासून भारत दूर पळत नाहीये, मात्र दहशतवाद व हिंसेतून मुक्तता मिळाल्याशिवाय, सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय काश्मीरच्या मुद्यावर चर्चा होऊ शकत नाही, असे स्वराज यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पाकिस्तानचा खोटेपणा उघड झालेला असताना भारताची या मुद्यावर काय भूमिका असेल असे विचारण्यात आले असता याप्रकरणीचे सर्व पुरावे केंद्र सरकार तपासून बघेल आणि त्यानंतर आवश्यकता वाटल्यास ही माहिती पुराव म्हणून पाकिस्तान सरकारला देऊ, असे स्वराज यांनी सांगितले.

Web Title: If there is no other issue than terrorism, then there is no discussion with Pakistan - Sushma Swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.