उद्या शेतकऱ्यांच्या रॅलीत हिंसाचार झाल्यास...; दहशतवादी संघटनेच्या मुखियाचा दिल्लीला फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 09:50 AM2021-01-25T09:50:56+5:302021-01-25T09:51:38+5:30

Farmer protest, Tractor Rally in Delhi: शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानकडून रचण्यात आलेल्या मोठ्या कारस्थानाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रजासत्ताक दिनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस अलर्टवर आहेत.

If there is violence in the farmers' rally tomorrow ...; Terrorist chief's phone call to Delhi | उद्या शेतकऱ्यांच्या रॅलीत हिंसाचार झाल्यास...; दहशतवादी संघटनेच्या मुखियाचा दिल्लीला फोन

उद्या शेतकऱ्यांच्या रॅलीत हिंसाचार झाल्यास...; दहशतवादी संघटनेच्या मुखियाचा दिल्लीला फोन

Next

प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये आंदोलक शेतकरी ट्रॅक्टर मार्च काढणार आहेत. याचबरोबर मुंबईतही आझाद मैदानावर लाखो शेतकरी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ट्रॅक्टर मार्चला दिल्लीत परवानगी देण्यात आली आहे. मार्गही ठरविण्यात आला आहे. सुमारे १२ हजार ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी होतील. शेतकऱ्यांना सोबत कोणतेही शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही दोन दिवसांपूर्वी एका शार्प शूटरला शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यामुळे सीआयएसएफच्या कंट्रोल रुमला एका बंदी घातलेल्या संघटनेकडून फोन आला होता. यामध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत धमकी देण्यात आली. 


सिख फॉर जस्टीस संघटनेचे दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू यांच्याकडून हा फोन कॉल करण्यात आला होता. यामध्ये जर उद्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये कोणताही हिंसाचार झाला तर त्याला संपूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला. २६ जानेवारीच्या आदल्या दिवशीच असा फोन आल्याने दिल्ली पोलीस आणि गुप्तहेर संघटना सतर्क झाल्या आहेत. 


सिख फॉर जस्टीस ही भारतात बंदी घातलेली संघटना आहे. या संघटनेचे नाव आधीही शेतकरी आंदोलनाशी जोडले गेले होते. हा फोन 13477934761 या नंबरवरून आला होता. या कॉलवरून सांगण्यात आले की, सिंघु बॉर्डरवर पंजाबचे शेतकरी जमलेले आहेत. आम्हाला कोणतीही हिंसा नको आहे. जर या रॅलीमध्ये कोणतीही हिंसा झाली तर भारतच यासाठी जबाबदार असेल, अशी धमकी देण्यात आली आहे. 


भारत सरकारने काही काळापूर्वीच गुरुपतवंत सिंह यांना दहशतवादी घोषित केले आहे. मोठ्या काळापासून ते खलिस्तानसाठी आवाज उठवत होते. 


पाकिस्तान सक्रीय...
शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानकडून रचण्यात आलेल्या मोठ्या कारस्थानाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रजासत्ताक दिनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस अलर्टवर आहेत. दरम्यान शेतकरी आंदोलनात गडबड करण्यासाठी पाकिस्तानने ट्विटरवरून कारस्थान रचल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच पाकिस्तानमधून हँडल होत असलेल्या ३०८ ट्विटर अकाऊंटची पडताळणी पोलिसांकडून सुरू असून, हे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 

Web Title: If there is violence in the farmers' rally tomorrow ...; Terrorist chief's phone call to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.