"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 10:24 AM2024-11-22T10:24:45+5:302024-11-22T10:26:01+5:30

मणिपूरमधील जिरीबाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आज माहिती दिली.

If there were no CRPF jawans the Manipur Chief Minister informed about the attack in Jiribam | "सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती

"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती

गेल्या काही दिवसापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे.  आता जिरीबाम जिल्ह्यात हिंसाचार झाला असून त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. या हल्ल्यावेळी वेळीच केंद्रीय राखीव पोलीस दलाने  हस्तक्षेप करून अनेकांचा जीव वाचवला आहे.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनीही या घटनेवर वक्तव्य केले आहे. बिरेन सिंह म्हणाले की, '१० कुकी दहशतवाद्यांनी जिरीबाममधील बोरोबेकरा येथे एका मदत छावणीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तिथे ११५ अंतर्गत विस्थापित लोक राहत होते, पण त्यांचे हल्लाचे नियोजन सीआरपीएफने हाणून पाडली.

‘कसाबलादेखील नि:पक्ष सुनावणी मिळाली’, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

आसामच्या आंतरराज्य सीमेवर असलेल्या बोरोबेकरा गावात ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय दलांसोबत झालेल्या गोळीबारात सर्व १० दहशतवादी ठार झाल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेत सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.

बिरेन सिंह म्हणाले की, जर सीआरपीएफ तैनात केले नसते तर अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असता. कुकी दहशतवादी रॉकेट लाँचर, एके 47 आणि अनेक अत्याधुनिक शस्त्रे घेऊन आले होते. त्यांनी पोलीस छावणीवर हल्ला या हल्ल्यात दोन जण जागीच ठार झाले.

हल्लेखोर बोरोबेकरा रिलीफ कॅम्पमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, तिथे ११५ मैतेई नागरिक राहत होते. मात्र सीआरपीएफने वेळीच हस्तक्षेप केल्याने जीव वाचला. सीएम बिरेन सिंह म्हणाले की, आठ निष्पाप लोकांचा बळी जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्यात दोन ठार झाले आणि तीन लहान मुलांसह सहा जणांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.

दुसरीकडे, मणिपूरच्या दहा कुकी आमदारांनी लुटलेली शस्त्रे परत मिळवण्यासाठी संपूर्ण राज्यात AFSPA लागू करण्याची मागणी केली आहे. या आमदारांमध्ये राज्यातील सत्ताधारी भाजप आघाडीच्या सात आमदारांचाही समावेश आहे.

दरम्यान, राज्याच्या काही भागात पुन्हा AFSFA लागू करण्याच्या मागणीसाठी इंफाळ खोऱ्यात निदर्शने करण्यात आली. तर राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त जिरीबामसह सहा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा पुन्हा लागू करण्यात आला आहे.

Web Title: If there were no CRPF jawans the Manipur Chief Minister informed about the attack in Jiribam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.