पंजाबवर कब्जा कायम ठेवला तर हमाससारखा हल्ला करू, खलिस्तान्यांची भारताला धमकी   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 09:04 AM2023-10-11T09:04:43+5:302023-10-11T09:06:06+5:30

Gurpatwant singh pannun: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्राइस-पॅलेस्टाइन युद्धातून धडा घेण्याची धमकी दिली आहे.

If they continue to occupy Punjab, they will attack like Hamas, Khalistani Terrorist Gurpatwant singh pannun threatens India | पंजाबवर कब्जा कायम ठेवला तर हमाससारखा हल्ला करू, खलिस्तान्यांची भारताला धमकी   

पंजाबवर कब्जा कायम ठेवला तर हमाससारखा हल्ला करू, खलिस्तान्यांची भारताला धमकी   

इस्राइल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सध्या तुंबळ धुमश्चक्री सुरू आहे. आतापर्यंत या संघर्षामध्ये सुमारे ३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान, खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्राइस-पॅलेस्टाइन युद्धातून धडा घेण्याची धमकी दिली आहे. आम्ही भारतातही अशाच प्रकारची प्रतिक्रिया देऊ, हिंसेतून हिंसाच निर्माण होते, असा इशारा पन्नू याने दिला आहे.

गुरपतवंत सिंग पन्नू याने सांगितले की, पॅलेस्टाइन आणि इस्राइल यांच्यात सुरू असलेल्या वादातून मोदींनी शिकण्याची गरज आहे. कब्ज्यामध्ये असलेल्या पॅलेस्टाइन आणि पंजाबमधील लोक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. जर भारतानेपंजाबवरील आपला कब्जा कायम ठेवला तर प्रत्युत्तर दिलं जाईल. तसेच भारत आणि पंतप्रधान मोदी त्यासाठी जबाबदार असतील. आमची संघटना एसएफजेचा बॅलेट आणि व्होट यावर विश्वास ठेवतो. पुढच्या काळात पंजाबची मुक्तता निश्चित आहे. इंडिया, चॉईस इज युअर्स, बॅलेट ऑर बुलेट, अशी धमकी त्याने दिली आहे.

गुरपतवंत सिंग पन्नूचा हा व्हिडीओ त्याच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर काही दिवसांमध्येच प्रसिद्ध झाला आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी धमकी दिल्याने तसेच शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.  

Web Title: If they continue to occupy Punjab, they will attack like Hamas, Khalistani Terrorist Gurpatwant singh pannun threatens India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.