‘आम्ही संपणारचं असतो तर गेल्या १००० वर्षांतच संपलो असतो’, सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 08:46 AM2022-02-10T08:46:32+5:302022-02-10T08:47:20+5:30
Mohan Bhagwat : कुणामध्येही आमच्याविरोधात उभे राहण्याची क्षमता नाही आहे. आम्हाला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण काही फायदा झाला नाही. आम्ही संपलो नाही. जर संपायचो असतो तर गेल्या एक हजार वर्षांत आम्ही संपलो असतो. मात्र आमचा सनातन धर्म कायम आहे
हैदराबाद - भक्त संत श्री रामानुजाचार्य यांच्या सहस्राब्दी जयंती सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल एक मोठे विधान केले. आम्हाला संपवण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र आम्ही संपणारच असतो तर ते गेल्या १०० वर्षांत संपलो, असतो, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
या सोहळ्यासाठी हैदराबाद येथे आलेल्या सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले की, व्यक्तीने नेहमी वैयक्तिक हितांऐवजी राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले पाहिजे. यावेळी सरसंघचालकांसोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे उपस्थित होते.
मोहन भागवत यांनी सांगितले की, लक्षात ठेवा आपले प्राधान्य हे हिंदू हिताला असले पाहिजे. ते राष्ट्रीय हित आहे. भाषा, जात यासारख्या गोष्टी नंतर येतात. आम्ही अशा कुठल्याही गोष्टीमध्ये सहभागी होणार नाही, जी आम्हाला आतून लढण्यासाठी प्रोत्साहित करेल. आपली क्षमता एवढी आहे की, कुणामध्येही आमच्याविरोधात उभे राहण्याची क्षमता नाही आहे. आम्हाला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण काही फायदा झाला नाही. आम्ही संपलो नाही. जर संपायचो असतो तर गेल्या एक हजार वर्षांत आम्ही संपलो असतो. मात्र आमचा सनातन धर्म कायम आहे.