आम्ही जिंकल्यास केरळमध्ये बीफसाठी "अच्छे दिन", भाजपा नेत्याचं आश्वासन
By admin | Published: April 2, 2017 07:02 PM2017-04-02T19:02:10+5:302017-04-02T21:52:39+5:30
दक्षिण केरळमध्ये विधानसभेच्या प्रचारादरम्यान भाजापाच्या एका नेत्यानी आपण जिंकूण आल्यास चांगल्या प्रकरचं बिफ मिळेल असा दावा केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. - उत्तर प्रदेशात भाजपा सरकारकडून अवैध कत्तलखान्यांविरोधात कारवाईची देशभरात चर्चा सुरु असतानाच दक्षिण केरळमध्ये विधानसभेच्या प्रचारादरम्यान भाजापाच्या एका नेत्यानी आपण जिंकूण आल्यास चांगल्या प्रकरचं बिफ मिळेल असा दावा केला आहे. तसेच त्याने तेथील मतदारांना याबाबत आश्वास्वनही दिले आहे.
एकीककडे भाजपाशासित राज्यात बिफबंदीवर जोर दिला जात असताना भाजापाच्या नेत्याच्या या विधानामुळे चर्चेला उधान आले आहे. दक्षिण केरळातील मल्लपूरम विधानसभेच्या निवडणूक प्रतारादरम्यान भाजपाचे उमेदवार एन. श्रीप्रकाश यांनी आपण निवडूण आल्यास चांगल्या पद्धतीचे बिफ मिळवून देऊ असा दावा केला आहे. मी पोटनिवडणुकीत जिंकून आल्यास लोकसभा मतदारसंघातील गोमांसाचा पुरवठा व्यवस्थित राहिल, याची काळजी घेईन, असे श्रीप्रकाश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी अनेक राज्यांमधील कत्तलखान्यांवर कारवाई केली आणि गोवंश हत्या बंदीदेखील लागू केली,ह्ण असा आरोपदेखील श्रीप्रकाश यांनी केला. ज्या राज्यांमध्ये गोहत्येवर बंदी आहे, त्याच राज्यांमध्ये गोमांस खाणे अवैध आहे,ह्ण असेही श्रीप्रकाश यांनी म्हटले
बिफ बंदीवर भाजपा नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्णाण होतं आहे. गेल्या आठवड्यात ईशान्य भारतात सत्तेत आल्यास आम्ही बीफ बंदी करणार नाही असं मेघालयमधील भाजपाचे सचिव डेव्हिड खर्सती यांनी म्हटलं आहे. मेघालय, मिझोरम, नागालँडमध्ये ख्रिस्ती धर्मीयांची संख्या जास्त आहे तसेच येथे नागरिक मोठ्या प्रमाणात बीफ खातात.