वाहन चालवत असाल, तर आत्ताच व्हा सावध! देशभरात ४.६१ लाख अपघातात १.६८ लाख मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 05:52 AM2023-11-01T05:52:55+5:302023-11-01T05:53:39+5:30
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून माहिती उघड
रिसर्च स्टाेरी - लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : रस्ते अपघात टाळण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही देशभरात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. वर्ष २०२२ मध्ये देशभरात एकूण ४,६१,३१२ अपघात झाले असून, त्यामध्ये १,६८,४९१ जणांचा मृत्यू तर ४,४३,३६६ लोक गंभीर जखमी झाले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अपघात कसे झाले?
- मागून धडक २१.४%
- समोरासमोर धडक १६.९%
- हिट अँड रन १४.६%
- बाजूने धडक १५.४%
- इतर १६.५%
- रस्त्यातून खाली उतरणे ४.५%
- वाहन उलटणे ४.४%
- झाडाला धडक ३.३%
- उभ्या वाहनांना धडक ३.१%
वर्ष अपघात वाढ मृत्यू जखमी
- २०१८ ४,७०,४०३ ०.२ टक्के १,५७,५९३ ४,६४,७१५
- २०१९ ४,५६,९५९ -२.९ टक्के १,५८,९८४ ४,४९,३६०
- २०२० ३,७२,१८१ -१८.६ टक्के १,३८,३८३ ३,४६,७४७
- २०२१ ४,१२,४३२ १०.८ टक्के १,५३,९९७२ ३,८४,४४८
- २०२२ ४,६१,३१२ ११.९ टक्के १,६८,४९१ ४,४३,३६६
अपघातांची संख्या
- तामिळनाडू ६४,१०५
- मध्यप्रदेश ५४,४३२
- केरळ ४३,९१०
- उत्तर प्रदेश ४१,७४६
- कर्नाटक ३९,७६२
- महाराष्ट्र ३३,३८३
काळजी घ्या
- रेड लाईट सिग्नल असताना वाहन थांबवा. पादचारी मार्गाचा वापर करा, सीटबेल्टचा नेहमी वापर करा.
- वाहन चालवताना मोबाइल वापरणे टाळा, हेल्मेट वापरा.
- मद्यपान करून वाहन चालवू नका, ओव्हरस्पीड टाळा.