परदेशात अडचणीत सापडल्यास ट्विट करून मला टॅग करा - सुषमा स्वराज
By admin | Published: January 9, 2017 08:35 AM2017-01-09T08:35:50+5:302017-01-09T08:40:09+5:30
परदेशात राहताना एखादी समस्या आल्यास त्याविषयी भारतीय दूतावासाला ट्विट करून त्यामध्ये मलाही टॅग करा असे स्वराज यांनी म्हटले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या अनेकांसाठी देवदूत ठरल्या आहे. ट्विटरवर नेहमी सक्रीय असणा-या स्वराज यांनी भारतीयांप्रमाणेच इतर नागरिकांनाही वेळोवेळी मदत केली आहे. त्याच स्वराज यांनी परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी आणखी एक पाऊल उचलत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 'परदेशात राहताना एखादी समस्या आल्यास त्याविषयी तुम्ही भारतीय दूतावासाला ट्विट करा आणि त्यामध्ये मलाही टॅग करा' अशी माहिती स्वराज यांनी ट्विटरवरूनच दिली आहे.
'परदेशात राहताना एखादी समस्या असल्यास त्या अडचणीबद्दल भारतीय दूतावासाला ट्विट करून सांगा व त्याच ट्विटमध्ये @sushmaswaraj हे माझे हॅण्डलही टॅग करा. आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला याची मदत होईल. तक्रार निवारणासाठी मी तुमच्या ट्विटकडे वैयक्तिकरित्या लक्ष देईन' असे त्यांनी नमूद केले आहे. ' आपत्कालीन परिस्थितीत कृपया #SOS हा हॅशटॅग नक्की वापरा,' असंही परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच स्वराज यांनी ट्विटर हॅण्डलच्या टाइमलाईनवर विविध देशातील भारतीय दूतावासांची यादीही पोस्ट केली आहे.
Please tweet your problem to the concerned Indian Embassy/authority and endorse the same to @sushmaswaraj. /1 Pl RT
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) 9 January 2017
I monitor their response to your tweets personally. In case of emergency pl mention #SOS. /2 Pl RT
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) 9 January 2017
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) 9 January 2017
मदतीस नेहमी तत्पर असणा-या स्वराज यांचे आत्तापर्यंत अनेकांना आभार मानले असून पंतप्रधान मोदींनीही त्यांचे कौतुक केले. मध्यंतरीच्या काळात प्रकृती अस्वास्थ्याचा सामना करावा लागत असतानाही स्वराज यांनी आपली भूमिका कर्तव्यदक्षपणे निभावत अडणचीत सापडलेल्या जोडप्याची मदत केली होती.