सत्तेत आल्यास पंजाबमधील ड्रग्जची समस्या एका महिन्यात संपवणार - राहुल गांधी

By admin | Published: June 13, 2016 02:38 PM2016-06-13T14:38:02+5:302016-06-13T14:38:02+5:30

आम्ही सत्तेत आल्यास एका महिन्यात पंजाबमधील ड्रग्जची समस्या संपवू असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे

If you come to power, Punjab will end the problem of drugs in a month - Rahul Gandhi | सत्तेत आल्यास पंजाबमधील ड्रग्जची समस्या एका महिन्यात संपवणार - राहुल गांधी

सत्तेत आल्यास पंजाबमधील ड्रग्जची समस्या एका महिन्यात संपवणार - राहुल गांधी

Next
ऑनलाइन लोकमत - 
जालंदर, दि. 13 - आम्ही सत्तेत आल्यास एका महिन्यात पंजाबमधील ड्रग्जची समस्या संपवू असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. पंजाबमध्ये ड्रग्जविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि अकाली दल फायदा होत असल्याने ही समस्या सोडवत नसल्याचा आरोपही केला आहे. 
 
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. 'सरकारला फायदा होत असल्याचे ड्रग्जवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाही आहेत. जर आम्ही सत्तेत आलो तर फक्त एका महिन्यात ही समस्या सोडवू शकतो. जास्त काही नाही फक्त पोलिसांचे हात मोकळे करावे लागतील. हे फक्त काँग्रेस करु शकत', असं राहुल गांधी बोलले आहेत. 
 
'जर पंजाबला उज्वल भविष्य हवं असेल तर राज्यात ड्रग्जचा वापर थांबवणे हा एकमेव पर्याय आहे. एकीकडे पंजाबमध्ये ड्रग्जची समस्या आहे आणि दुसरीकडे कायदा - सुव्यवस्था, बेरोजगारीची समस्या आहे. जर तुम्हाला ड्रग्जची समस्या सोडवायची असेल तर पोलिसांना मोकळीक द्यावी लागेल, हे काम अकाली दल करत नाही आहे', असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. 
 
राहुल गांधी 'उडता पंजाब' चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावरही बोलले आहेत. पंजाबमध्ये ड्रग्जची समस्या असताना चित्रपटांवर बंदी आणली जात आहे. अजूनही सत्यता स्विकारली जात नाही आहे असं राहुल गांधी बोलले आहेत. 
 

Web Title: If you come to power, Punjab will end the problem of drugs in a month - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.