लोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 04:05 PM2019-03-21T16:05:34+5:302019-03-21T16:21:37+5:30

निवडणूक आयोगाने या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिली आहे.

If you do not vote for the Lok Sabha Election, you will be deducting 350 rupees from the bank account | लोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार

लोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार

googlenewsNext

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान न करणे महागात पडणार आहे. निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार, मतदान न करणाऱ्या व्यक्तींची ओळख आधारकार्डद्वारे होणार आहे. तर, या कार्डद्वारे लिंक असलेल्या बँकेतून 350 रुपये वजा होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यांसदर्भात सर्वच सरकारी बँकांना आदेश दिले आहेत. ( बुरा न मानो होली है )

निवडणूक आयोगाने या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिली आहे. आयोगच्या प्रवक्त्यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. देशातील सर्वच मतदारांना लक्षात घेऊनच मतदान प्रक्रियेची तयारी करण्यात येते. त्यामुळे जे मतदार मतदानाचा हक्क बजावत नाहीत, त्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने केलेला खर्च वायपट जातो. प्रत्येकी एका मतदानासाठी आयोगाला 350 रुपये खर्च येतो. म्हणूनच, जो मतदार मतदान करणार नाही, त्या मतदाराकडून निवडणूक आयोग 350 रुपये वसुल करणार आहे. 

विशेष म्हणजे ज्या मतदारांचे बँक अकाऊंट नसेल, त्या मतदारांकडून मोबाईल फोनचे रिचार्ज करताना हे 350 रुपये वसुल केले जाणार आहेत. त्यासाठी कमीत-कमी 350 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. त्यापेक्षा कमी रकमेचा रिचार्ज फोनवरुन होणार नाही. विशेष म्हणजे, आयोगाच्या या आदेशाविरुद्ध कुणीही न्यायालयात दाद मागू नये, यासाठी अगोदरच आयोगाने न्यायालयाकडून या आदेशाची परवानगी घेतली आहे. दरम्यान, देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 7 टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. तर 23 मे रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार सध्या देशात आदर्श आचासंहित लागू करण्यात आली आहे. 
( बुरा न मानो होली है, आज होळीनिमित्त ही बातमी प्रसिद्ध करण्यात येत असून निवडणूक आयोगाने अशी शक्कल लढवायला हवी )

Web Title: If you do not vote for the Lok Sabha Election, you will be deducting 350 rupees from the bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.