सनातन धर्मावर विश्वास नसेल तर इस्लाम कबूल करा, लालू प्रसाद यादव यांना भाजपाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 09:52 AM2023-09-22T09:52:18+5:302023-09-22T09:53:14+5:30

BJP Criticize Lalu Prasad Yadav: जर सनातन धर्मावर विश्वास नसेल तर लालू प्रसाद यादव यांनी जीवनाच्या या टप्प्यात धर्मपरिवर्तन करून इस्लाम कबूल केला पाहिजे. कारण ते सातत्याने देशातील जनता आणि सनातन धर्माला तोडत आहेत.

If you don't believe in Sanatan Dharma, accept Islam, BJP's advice to Lalu Prasad Yadav | सनातन धर्मावर विश्वास नसेल तर इस्लाम कबूल करा, लालू प्रसाद यादव यांना भाजपाचा सल्ला

सनातन धर्मावर विश्वास नसेल तर इस्लाम कबूल करा, लालू प्रसाद यादव यांना भाजपाचा सल्ला

googlenewsNext

बिहारमधीलभाजपाचे वरिष्ठ नेते आणि आमदार जनक राम यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले की, एकीकडे राजदचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर एकीकडे श्रीरामचरित मानस हे पोटॅशियम सायनाइड असल्याचे म्हणत आहेत, सनातन धर्मावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे नेते लालूप्रसाद यादव हे देशभरात फिरून देवी-देवतांच्या मंदिरांमध्ये फिरून दर्शन घेत आहेत.

जनक राम म्हणाले की, जर सनातन धर्मावर विश्वास नसेल तर लालू प्रसाद यादव यांनी जीवनाच्या या टप्प्यात धर्मपरिवर्तन करून इस्लाम कबूल केला पाहिजे. कारण ते सातत्याने देशातील जनता आणि सनातन धर्माला तोडत आहेत. जनक राम यांच्या निशाण्यावर बिहार सरकारमधील मंत्री जनक राम यांच्या निशाण्यावर बिहार सरकारमधील मंत्री प्रा. चंद्रशेखर, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव होते.

जनकराम गोपालगंजमध्ये भाजपा आमदार राजीव कुमार यांच्या कार्यक्षेत्रात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. तिथे ते भाजपा आमदार राजीव सिंह यांच्या आईच्या निधनामुळे श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले होते. काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी एका कार्यक्रमादरम्यान, रामचरित मानसामध्ये पोटॅशियम सायनाइड असल्याचे म्हटले होते. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत यामध्ये पोटॅशियम सायनाइड असेल तोपर्यंत मी त्याचा विरोध करेन. चंद्रशेखर यांच्या या विधानानंतर देशभरातून त्यांना विरोध होत आहे. चंद्रशेखर हे याआधीही आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत राहिले आहेत.  

Web Title: If you don't believe in Sanatan Dharma, accept Islam, BJP's advice to Lalu Prasad Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.