'पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 10:27 AM2019-09-14T10:27:50+5:302019-09-14T10:33:51+5:30
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं असल्याचं म्हटलं आहे.
चंदीगड - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं असल्याचं म्हटलं आहे. 'पाकव्याप्त काश्मीर पाकिस्ताननेभारताला सोपवणे हे पाकिस्तानच्या हिताचं आहे. जर पाकिस्तानला युद्ध नको असेल आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानच्या हिताचा विचार करत असतील तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा' असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
'पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानसोबत राहायचं नाही. गेल्या 70 वर्षांपासून पाकिस्तानने काश्मीरचा एक तृतीयांश भाग गिळंकृत केला आहे. हे प्रकरण गंभीर आहे' असं आठवले यांनी म्हटलं आहे. चंदीगड येथे खात्याच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रामदास आठवले यांनी असं म्हटलं आहे. 'नरेंद्र मोदी हे धाडसी पंतप्रधान आहेत. कलम 370 रद्द करण्याचा त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. पाकिस्तानने अनेकदा काश्मीरचा मुद्दा उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने आता भारताला पाकव्याप्त काश्मीर सोपवला पाहिजे आणि ते पाकिस्तानच्या हिताचं असेल' असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
Union Minister Ramdas Athawale, in Chandigarh: Reports are coming in that people in PoK don't want to be with Pakistan & want to join India. Since 70 years Pakistan has had 1/3rd of our Kashmir captured. It is a serious matter. (13.09.2019) https://t.co/VHhwGR6RZ0
— ANI (@ANI) September 14, 2019
रामदास आठवले यांनी 'पाकिस्तानने जर पाकव्याप्त काश्मीर भारताकडे सोपवला तर आम्ही त्या ठिकाणी उद्योगधंदे उभारू. तसेच पाकिस्तानलाही व्यापारात मदत करू. भारत त्यांना गरिबी आणि बेरोजगारीशी लढण्यासही मदत करेल' असंही म्हटलं आहे. हरियाणामध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर भाष्य करताना त्यांनी आपला पक्ष 90 पैकी 10 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे.
Union Minister Ramdas Athawale, in Chandigarh: If Pakistan wants good for itself, it should hand over Pakistan occupied Kashmir (PoK) to us. If they don't want a war and Imran Khan thinks of Pakistan's interest then he should hand over PoK to us. (13.09.2019) pic.twitter.com/84pgN5EnDO
— ANI (@ANI) September 14, 2019
'वंचित'पासून फारकत घेतलेल्या एमआयएमचे रामदास आठवलेंकडून स्वागत!
आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर मुस्लीम आणि दलित मतांना सोबत घेऊन राज्याच्या राजकारणात नवीन आघाडी उदयाला आणतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, त्यांच्या या इराद्याला विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुरंग लागल्याचे चित्र आहे. लोकसभेला सोबत लढलेला एमआयएमने वंचितपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या या निर्णयाचे आरपीआय नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी कौतुक केले आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएमला वंचितसोबत जाऊन काहीही फायदा झाला नाही. उलट वंचितला सर्वाधिक फायदा झाला. यापुढेही वंचित आघाडीतून आणखी काही लोक बाहेर पडतील. ते बाहेर पडलेले लोक आमच्या पक्षात सामील होतील असा दावा करताना आठवले यांनी वंचितमधून बाहेर पडलेल्या एमआयएमचे स्वागतच केले. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या वेळी राज्यातील विधानसभेत पुढील विरोधीपक्ष नेते वंचितचा असेल असा दावा केला होता. त्यामुळे वंचितच्या नेत्यांचे मनोबल वाढले होते. परंतु, आठवले यांच्या मते विरोधीपक्ष नेते होण्याइतकी मते वंचितला मिळणार नाही. लोकसभेला त्यांना मते मिळाली असली तरी विधानसभा निवडणुकीत त्यांना फारसा लाभ होणार नाही, असंही आठवले यांनी सांगितले.