5,10 किंवा 25 पैशांचे जुने नाणे तुम्हाला बनवेल लखपती, जाणून घ्या कसे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 20:07 IST2021-08-04T20:03:57+5:302021-08-04T20:07:43+5:30
Indian Currency: जुन्या नाण्यांना ऑनलाइन 1.50 लाख रुपयांपर्यंत किंमत मिळते.

5,10 किंवा 25 पैशांचे जुने नाणे तुम्हाला बनवेल लखपती, जाणून घ्या कसे...
नवी दिल्ली: जर तुम्हाला जुनी नाणी गोळा करण्याची आवड असेल तर तुम्ही लखपती होऊ शकता. अनेकजण जुन्या नाण्यांना सांभाळून ठेवतात. या जुन्या नाण्यांची किंमत सध्या खूप वाढली आहे. बऱ्याच जणांना जुनी नाणी खरेदी करण्याची आवड असते. अशा जुन्या नाण्यांची आवड असणाऱ्या व्यक्तीला ही नाणी विऊन तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात. ही जुनी नाणी विकून लाखो रुपये कसे मिळवायचे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुमच्याकडे 5,10 किंवा 25 पैशांचा सिल्वर कलरचा कॉइन असेल, तर तुम्ही हे नाणे ऑनलाइन विकून 1.50 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. क्विकरच्या वेबसाइटवर या जुन्या नाण्यांना लाखो रुपयात खरेदी केले जाते. फक्त तुमच्या नाण्यावर मां वैष्णव देवीचा फोटो असायला हवा. अशा नाण्यांना मार्केटमध्ये जास्त मागणी आहे.
नाणी विकण्यासाठी करा हे काम
जुनी नाणी विकण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला क्विकर (Quickr) वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. तिथे तुमचे नाणे विकले जाईल. क्विकरशिवाय इंडियामार्ट डॉट कॉमवरही जुनी नाणी किंवा नोटांची बोली लावली जाते. सर्वात आधी या नाण्याचे काही फोटो काढून साइटवर अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नाण्यासाठी योग्य गिराईक मिळेल. त्याच्याशी तुम्ही भावही करू शकता. जुन्या नाण्यांमध्ये 5, 10 आणि 25 पैशांच्या नाण्याला चांगला भाव मिळतो.