हिंमत असेल तर सर्वांसाठी दोन अपत्यांचा कायदा आणा - प्रवीण तोगडीया
By admin | Published: January 14, 2015 03:00 PM2015-01-14T15:00:52+5:302015-01-14T15:00:52+5:30
लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी फक्त हिंदूवर लादू नका, हिंमत असेल तर भारतातील सर्व धर्मीयांसाठी दोन अपत्यांचा कायदा आणावा असे विधान विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. १४ - हिंदूंच्या अपत्यांवरुन सुरु असलेल्या वादग्रस्त विधानांच्या मालिकेत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनीही उडी मारली आहे. लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी फक्त हिंदूवर लादू नका, हिंमत असेल तर भारतातील सर्व धर्मीयांसाठी दोन अपत्यांचा कायदा आणावा असे विधान विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी केले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला ५० वर्ष झाली असून या निमित्ताने बरेली येथे हिंदू संमलेनाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत तोगडीया यांनी दोन अपत्यांचा कायदा आणावा अशी मागणी केद्र सरकारकडे केली. केंद्र सरकारने या कायद्यासंबंधी गांभीर्याने विचार करण्याची गरज असून संसदेत याविषयी चर्चा करुन दोन अपत्यांचा कायदा तयार व्हायला हवा असे मत त्यांनी सभेनंतर पत्रकारांशी बोलताना मांडले. केंद्र सरकारने हा कायदा तयार करताना तो सर्व धर्म - जातींना लागू होईल याची दक्षता घेतली घ्यावी. हा कायदा फक्त हिंदूंना लागू केल्यास आम्ही ते खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. हिंदूंनी जास्त मुलांना जन्म द्यावा असे विधान करणा-यांना गप बसवले जाते. पण जे प्रत्यक्षात १० मुलांना जन्म देऊन देशाला गरीब बनवत आहेत अशा मुसलमानांवर कोणीच कारवाई करत नाही असे टीकास्त्र त्यांनी सोडले.