‘बाबा’ पालकामध्ये व्हिटॅमिन डी डेफिशिअन्सी असेल तर तुमचं बाळही असू शकतं खुंटित, खुरटं आणि अशक्त

By Admin | Published: May 19, 2017 05:12 PM2017-05-19T17:12:17+5:302017-05-19T17:12:17+5:30

नवं संशोधन सांगतं, तुम्हाला तुमचं बाळ जर हवं असेल हेल्दी, तर आईबरोबर बाबाही हवेत सुदृढ, निरोगी, निर्व्यसनी..

If you have vitamin D deficiencies in the 'Baba' parent, then your baby may be defective, lean and vulnerable | ‘बाबा’ पालकामध्ये व्हिटॅमिन डी डेफिशिअन्सी असेल तर तुमचं बाळही असू शकतं खुंटित, खुरटं आणि अशक्त

‘बाबा’ पालकामध्ये व्हिटॅमिन डी डेफिशिअन्सी असेल तर तुमचं बाळही असू शकतं खुंटित, खुरटं आणि अशक्त

googlenewsNext

 - मयूर पठाडे

 
भारतासारख्या देशात सूर्यप्रकाश अत्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, तरीही सूर्यप्रकाशाच्या अभावी मानवी शरीरात ज्या कमतरता निर्माण होतात त्यानं बहुतांश भारतीय पिडीत आहेत, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार तर आता हेदेखील सिद्ध झालं आहे की वडिलांमध्ये जर व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मुलांनाही भोगावे लागू शकतात. अशा पालकांच्या मुलांची उंची आणि वजन खुंटित राहू शकते असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे. 
 
 
बाळाच्या जन्मापूर्वी आईचीच तेवढी तब्येत सुदृढ असली पाहिजे असं आपल्याकडे मानलं जातं. आपल्याबरोबरच जगात बर्‍याच ठिकाणीही असाच समज आहे. पण हा समज या नव्या संशोधनानं पुन्हा एकदा खोडून काढला आहे. बाळाच्या जन्मापूर्वी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आई जेवढी सुदृढ हवी तेवढाच बाबाही सक्षम असला पाहिजे. 
त्यामुळे बाबा पालकांनो लक्षात ठेवा, तुमचं बाळ जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ हवं असेल, तर तुम्हालाही तसंच असायला हवं. आपल्याला जर काही वाईट सवयी असतील, सुदृढ नसाल तर आधी आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि मगच बाळाला जन्म देण्याचा विचार करा..

Web Title: If you have vitamin D deficiencies in the 'Baba' parent, then your baby may be defective, lean and vulnerable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.