अनुदान पाहिजे असेल तर स्वत:ची नोंदणी करा

By admin | Published: November 2, 2016 03:50 AM2016-11-02T03:50:28+5:302016-11-02T03:50:28+5:30

सर्व संघटनांना नीती आयोगाच्या एनजीओ-पीएस पोटर््लवर नोंदणी करणे यापुढे अनिवार्ण असेल, असे नीती आयोगाने नुकतेच स्पष्ट केले.

If you need a grant, register yourself | अनुदान पाहिजे असेल तर स्वत:ची नोंदणी करा

अनुदान पाहिजे असेल तर स्वत:ची नोंदणी करा

Next


नवी दिल्ली : सरकार किंवा संलग्न विभागाकडून अनुदान प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघांसहीत (एनएफएस) इतर सर्व संघटनांना नीती आयोगाच्या एनजीओ-पीएस पोटर््लवर नोंदणी करणे यापुढे अनिवार्ण असेल, असे नीती आयोगाने नुकतेच स्पष्ट केले.
याबाबतीत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सांगितले, की पारदर्शीपणा आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, एनएफएसला स्वत:ची नोंदणी करण्याबाबत सांगितले आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघ सरकारी संस्था नाही आणि आता आयोगाच्या या पावलानंतर यापुढे सरकारी अनुदान मिळवण्यासाठी त्यांना एनजीओ-पीएस पोटर््लवर स्वत:ची नोंदणी करणे अनिवार्य असेल.
जर कोणतीही एनजीओ संस्था या पोटर््लवर स्वत:ची नोंदणी करणार नसेल, तर त्यांना मंत्रालय किंवा विभागाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही. त्याचवेळी अनेक संस्थांनी याआधीच आपली नोंदणी केली असल्याचेही गोयल यांनी या वेळी सांगितले.
आयोगाने नोंदणी करण्यासाठी सहज प्रक्रिया ठेवली असून, संघटना एनजीओ - पीएस पोर्टलवर जाऊन आॅनलाईन नोंदणी करू शकतात. त्याच वेळी विनासरकारी संघटनांना सर्वप्रथम आॅफिस मालकाचे नाव, पत्ता, पॅन क्रमांक आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती द्यावी लागेल. यानंतर त्यांना एक युनिक क्रमांक मिळेल, ज्याद्वारे ते मंत्रालयाकडून अनुदानासाठी निवेदन करू शकतील. (वृत्तसंस्था)

Web Title: If you need a grant, register yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.