‘वेलकम टू इंडिया’ म्हटलं तर लगावला ठोसा ? जर्मन नागरिकाला मारहाण प्रकरणी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 10:18 AM2017-11-05T10:18:00+5:302017-11-05T10:23:50+5:30
मी जर्मन नागरिकाला ‘वेलकम टू इंडिया’ असं म्हणून त्याचं स्वागत केलं, तर यावर त्याने मला ठोसा लगावला. इतकंच नव्हे तर...
सोनभद्र : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र रेल्वे स्थानकावर एका जर्मन नागरिकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अमन यादव असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. ‘एएनआय’या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
German national beaten up at Sonbhadra railway station. Police have arrested the accused, investigation underway pic.twitter.com/LmoYC2WVXF
— ANI UP (@ANINewsUP) November 5, 2017
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित अमन यादव याने आपण निर्दोष असल्याचं म्हटले आहे. याउलट त्याने जर्मन नागरिकावरच मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मी जर्मन नागरिकाला ‘वेलकम टू इंडिया’ असं म्हणून त्याचं स्वागत केलं, तर यावर त्याने मला ठोसा लगावला. इतकंच नव्हे तर तो माझ्यावर थुंकलाही, असा आरोप यादवने केला आहे. याप्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहेत.
I am innocent, the German national punched me when i said 'welcome to India' to him. He even spit on me: Aman Yadav,arrested accused pic.twitter.com/PrcO2gudIw
— ANI UP (@ANINewsUP) November 5, 2017