चुकीच्या व्यक्तीला भुललात तर फ्रिजमध्ये तुकडे मिळतील; कथाकार प्रदीप मिश्रांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 22:45 IST2025-01-21T22:45:05+5:302025-01-21T22:45:23+5:30
भविष्यातील होणाऱ्या लव्ह जिहादसारख्या संभाव्य घटनांपासून वाचण्यासाठी त्यांनी शिवभक्तांना सतर्क केले.

चुकीच्या व्यक्तीला भुललात तर फ्रिजमध्ये तुकडे मिळतील; कथाकार प्रदीप मिश्रांचे वक्तव्य
लव्ह जिहादबाबत सूरतचे कथाकार प्रदीप मिश्रा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मिश्रा यांनी तरुणींना सावध केले असून अर्धवट घरे आणि खऱ्या व्यक्तीला ओळखा. चुकीच्या व्यक्तीच्या बंगल्याला पाहून भुललात तर फ्रिजमध्ये तुकडे मिळतील, त्यासाठी देखील तयार रहावे, असा सल्ला दिला आहे.
भविष्यातील होणाऱ्या लव्ह जिहादसारख्या संभाव्य घटनांपासून वाचण्यासाठी त्यांनी शिवभक्तांना सतर्क केले. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या विधानावर काँग्रेस प्रवक्ते अभिनव बरोलिया यांनी टीका केली आहे. देश संविधानाने चालवला जातो आणि संविधानाचे पालन केले पाहिजे. ते एक धार्मिक नेते आहेत आणि त्यांनी धर्माचा प्रसार केला पाहिजे. संविधान महत्त्वाचे आहे आणि पोलीस नियमांनुसार कारवाई करतात. जो कोणी चूक करतो त्याच्यावर कायदा कारवाई करतो, असे ते म्हणाले.
मिश्रा यांच्या विधानावर मौलाना अनस अली नदवी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते एक धार्मिक नेते आहेत आणि त्यांनी कोणत्याही धर्माचा अपमान करू नये. त्यांनी द्वेष पसरवू नये आणि सर्व धर्मांमध्ये काय बरोबर आहे ते सांगावे, असे ते म्हणाले.
तर मिश्रा यांच्या समर्थनार्थ भाजपा धावून आली आहे. प्रदीप मिश्रा हे एक धार्मिक नेते आहेत आणि ते समाजाला जागरूक करतात. समाजाला जागरूक करणे हे धार्मिक नेत्याचे काम आहे आणि ते त्यांचे काम करत आहेत. खरं तर अशी प्रकरणे समोर येतात आणि म्हणूनच जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.