सत्ता टिकवायची असेल तर सेंगोटेयन यांना बनवा मुख्यमंत्री, बंडखोर आमदारांची अट 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 05:10 PM2017-08-23T17:10:22+5:302017-08-23T17:14:41+5:30

पलानीस्वामी आण पनीरसेल्वम यांच्यात समेट झाल्यानंतर अण्णा द्रमुक पक्षात पुन्हा फूट पडली आहे. दिनकरन यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर आता या आमदारांनी राज्यातील सरकार टिकवायचे असेल तर सेंगोटेयन यांना मुख्यमंत्री बनवा अशी मागणी केली आहे.

If you want to retain power, make Sengotainan the Chief Minister, the condition of the rebel MLAs | सत्ता टिकवायची असेल तर सेंगोटेयन यांना बनवा मुख्यमंत्री, बंडखोर आमदारांची अट 

सत्ता टिकवायची असेल तर सेंगोटेयन यांना बनवा मुख्यमंत्री, बंडखोर आमदारांची अट 

Next

चेन्नई, दि. 23 - पलानीस्वामी आण पनीरसेल्वम यांच्यात समेट झाल्यानंतर अण्णा द्रमुक पक्षात पुन्हा फूट पडली आहे. दिनकरन यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर आता या आमदारांनी राज्यातील सरकार टिकवायचे असेल तर सेंगोटेयन यांना मुख्यमंत्री बनवा अशी मागणी केली आहे. या बंडाचे नेतृत्व करत असलेले दिनकरन सध्या दुहेरी डिप्लोमसीवर काम करत आहेत. एकीकडे ते पलानीस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी डीएमकेच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत तर दुसरीकडे सरकार टिकवायचे असेल तर आमच्या पसंतीचा मुख्यमंत्री बनवा अशी अट त्यांनी अण्णा द्रमुकला घातली आहे. 
दिनकरन यांच्या या डबल गेममुळे अण्णा द्रमुकमधील नेत्यांची झोप उडाली आहे. तर डीएमकेही संभ्रमित झाली आहे. दिनकरन यांनी के. ए. सेंगोटेयन यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सूचवले आहे. मात्र दिनकरन यांच्या या प्रस्तावाला सत्ताधारी अण्णा द्रमुकने अद्याप फार महत्त्व दिलेले नाही. यासंदर्भात पलानीस्वामी गटाच्या एका नेत्याने सांगितले की, मुख्यमंत्री बदलल्यास आपण पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे दिनकरन यांच्या गटाकडून सांगण्यात आले आहे. मात्र नेतृत्वात कोणताही बदल होणार नसल्याचे आम्ही स्पष्ट केले आहे.   
एकीकडे सेंगोटेयन यांचे नाव दिनकरन यांच्याकडून पुढे करण्यात येत असतानाच शशिकला यांचे भाऊ व्ही. के. दिवाकरन यांनी विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांना मुख्यमंत्री करण्यात यावे अशी मागणी केली आहे.  अण्णा द्रमुकच्या बंडखोर आमदारांना राज्यपालांना एक पत्र लिहिले असून, आम्ही पाठिंबा काढून घेत आहोत. मात्र अण्णा द्रमुकचे सरकार पाडण्याची आमची इच्छा नाही. असे म्हटले होते. त्यावरून केवळ मुख्यमंत्री बदलणे हाच त्यांचा प्रयत्न असून. सरकार पाडण्याचा त्यांचा इरादा नसल्याचे स्पष्ट होत आहे.   
माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतचे रोज नवनवे अंक सादर होत आहेत. माजी मुख्यमंत्री पनिरसेल्वम आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे गट  एकत्र आल्यानंतर आता दिनकरन यांचे समर्थक असलेल्या 19 आमदारांनी पलानीस्वामी सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच या आमदारांच्या गटामधील संभाव्य फूट टाळण्यासाठी त्यांना पुदुच्चेरीमधील रिसॉर्टवर पाठवण्यात आले आहे.  दरम्यान, 19 आमदारांनी पाठिंबा मागे घेतल्याने 234 सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत पलानीस्वामी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.  सध्या एआएडीएमकेच्या सगळ्या गटांचे मिळून 135 आमदार आहेत. मात्र संभाव्य फोडाफोडीमुळे पलानीस्वामी यांची खुर्ची डळमळीत झाली आहे. 
 

Web Title: If you want to retain power, make Sengotainan the Chief Minister, the condition of the rebel MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत