'आमच्या आदेशाकडे तीन वेळा दुर्लक्ष केलं, परिणाम भोगावे लागतील'; पतंजली प्रकरणात SC ची कडक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 01:17 PM2024-04-10T13:17:30+5:302024-04-10T13:18:07+5:30
...यापूर्वी 2 एप्रिलला झालेल्या सुनावणीत पतंजलीच्या वतीने माफीनामा सादर करण्यात आला होता.
पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी बाबा रामदेव आणि बाळकृष्ण हे दोघेही न्यायालयात उपस्थित होते. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. यापूर्वी 2 एप्रिलला झालेल्या सुनावणीत पतंजलीच्या वतीने माफीनामा सादर करण्यात आला होता.
सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल म्हणाले, या प्रकरणात बिनशर्त माफी मागावी, असे आम्ही सुचवले होते. न्यायालयाने स्वामी रामदेव यांचे बिनशर्त माफीचे प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यासही नकार दिला आहे. न्यायमूर्ती अमानुल्लाह म्हणाले, या लोकांनी आमच्या आदेशाकडे तीन वेळा दुर्लक्ष केले आहे. यांनी चूक केली आहे. याचे परिणाम यांना भोगावे लागतील.
आम्ही प्रतिज्ञापत्र फेटाळत आहोत - न्यायालय
जस्टिस अमानुल्लाह म्हणाले, आपण प्रतिज्ञापत्रात फसवणूक करत आहात. हे कुणी तयार केली? मला आश्चर्य वाटते. तसेच, आपण असे प्रतिज्ञापत्र द्यायला नको होते, असे न्यायमूर्ती कोहली म्हणाल्या. यावर वकील मुकुल रोहतगी म्हणाले, आमच्याकडून चूक झाली. यावर न्यायालय म्हणाले, चूक! अतिशय छोटा शब्द. असो यावर आम्ही निर्णय घेऊ. याला आम्ही जाणून-बुजून न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना मात आहोत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे, 'आमच्या आदेशानंतरही? या प्रकरणात आमची एवढे उदार होण्याची इच्छा नाही. हे प्रतिज्ञापत्र आम्ही फेटाळत आहोत. हा केवळ कागदाचा एक तुकडा आहे. आम्ही अंध नाही! आम्हाला सर्व दिसते.' यावर, मुकुल रोहतगी म्हणाले, लोकांकडून चुका होतच असतात, यावर न्यायालय म्हणाले, मग चुका करणाऱ्यांना भोगावेही लागते. मग त्यांना त्रासही सहन करावा लागतो. या प्रकरणात आमची एवढे उदार होण्याची इच्छा नाही.