शहरात पुन्हा बळावले अतिक्रमण मनपाचे दुर्लक्ष: पदाधिकार्‍यांचे घुमजाव व आयुक्तांच्या बदलीमुळे अतिक्रमण विभागाचे फावले

By admin | Published: June 20, 2016 12:22 AM2016-06-20T00:22:15+5:302016-06-20T00:22:15+5:30

जळगाव: मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची बदली होताच व महासभेत जप्त केलेले सामान परत न देण्याच्या भूमिकेत बदल करीत पदाधिकारी व सदस्यांनी केलेले घुमजाव यामुळे शहरात पुन्हा अतिक्रमण बळावले आहे. तर हप्ता वसुलीसाठी मोकळे रान मिळाल्याने अतिक्रमण विभागाचे चांगलेच फावले आहे.

Ignoring the encroachment again in the city: The encroachment department has foiled due to the rotation of the office bearers and the transfer of the Commissioner | शहरात पुन्हा बळावले अतिक्रमण मनपाचे दुर्लक्ष: पदाधिकार्‍यांचे घुमजाव व आयुक्तांच्या बदलीमुळे अतिक्रमण विभागाचे फावले

शहरात पुन्हा बळावले अतिक्रमण मनपाचे दुर्लक्ष: पदाधिकार्‍यांचे घुमजाव व आयुक्तांच्या बदलीमुळे अतिक्रमण विभागाचे फावले

Next
गाव: मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची बदली होताच व महासभेत जप्त केलेले सामान परत न देण्याच्या भूमिकेत बदल करीत पदाधिकारी व सदस्यांनी केलेले घुमजाव यामुळे शहरात पुन्हा अतिक्रमण बळावले आहे. तर हप्ता वसुलीसाठी मोकळे रान मिळाल्याने अतिक्रमण विभागाचे चांगलेच फावले आहे.
मनपाने सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसार शहरातील ११ रस्त्यांवरील व पदपथांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे पक्के अतिक्रमण तसेच हॉकर्सला हटविण्याचा निर्णय महासभेत घेतला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत अतिक्रमण विभागाने कारवाई केली तरीही महिनाभरात जप्त केलेले सामान परत मिळत असल्याने अतिक्रमण पुन्हाहोते. त्यामुळे जप्त केलेले सामान परत न करता त्याचा लिलाव करण्याचा ठराव करण्यात आला होता. तसेच नगरसेवक व राजकीय नेते, पदाधिकार्‍यांनी अतिक्रमणच्या कारवाईत हस्तक्षेप न करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.
धडाक्याने सुरूवात
ठराव झाल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने धडाक्याने कारवाई सुरू केली. चित्रा चौक ते गोलाणी मार्केट, गोविंदा रिक्षा स्टॉप ते नेहरू चौक, नेहरू चौक ते टॉवर चौक, शिवाजीरोड, चौबे शाळा ते सुभाष चौक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र बळीरामपेठेतील भाजीपाला विक्रेत्यांच्या स्थलांतरात न्यायालयीन प्रक्रियेमुळे थोडा विलंब झाला. त्याचा लाभ हितसंबंध गुंतलेल्या राजकीय व्यक्तींनी उचलला.
राजकारण घुसले
या अतिक्रमण हटाव मोहिमेत राजकारण घुसले. आमदार सुरेश भोळे यांनी तर थेट सुभाष चौकातील हॉकर्सच्या बैठकांमध्ये हजेरी लावत त्यांना भडकविण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आपलाच वाईटपणा कशाला? असे म्हणत या मोहिमेत सर्वांच्या संमतीने प्रशासन व अतिक्रमणधारकांमध्ये समन्वयाची जबाबदारी सोपविलेल्या मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी अंग काढून घेतले. त्यातच महासभेत जप्त केलेले साहित्य परत करण्याचा फेर ठराव नुकत्याच झालेल्या महासभेत करण्यात आला. आयुक्त संजय कापडणीस यांचीही बदली झाली. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावले.
मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण
मनपाने कारवाई केलेल्या रस्त्यांवर देखील पुन्हा अतिक्रमण झालेले दिसून येत आहे. गोलाणी मार्केटसमोरील रस्त्यावर पुन्हा हॉकर्स, फुल विक्रेते दिसू लागले आहेत. मनपाच्या अतिक्रमण विभागाचे मात्र सोयीस्करपणे दूर्लक्ष होत आहे. तर सुभाष चौकात शनिवारी पुन्हा हॉकर्सने अतिक्रमण केले होते. स्टेशनरोडवरील अतिक्रमण तर कारवाई झाल्यानंतरही कायमच होते. त्याकडे सुरूवातीपासूनच अतिक्रमण विभागाचे सोयीस्करपणे दूर्लक्ष होत होते. त्यातही आता वाढ झाली आहे. स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ पुन्हा अतिक्रमणांचा विळखा पडला आहे.

Web Title: Ignoring the encroachment again in the city: The encroachment department has foiled due to the rotation of the office bearers and the transfer of the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.