हृदयद्रावक! वडिलांना ब्रेन हॅमरेज, आई हार्ट पेशंट; घरातील कर्त्या मुलाला कारची धडक, झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:18 IST2023-01-19T14:40:11+5:302023-01-19T15:18:14+5:30
अशरफच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे त्यांच्या एका नातेवाईकाने सांगितलं. त्याची आई हार्ट पेशंट आहे. तीन बहिणींचा तो एकुलता एक भाऊ होता.

फोटो - आजतक
दिल्लीमध्ये आयआयटीजवळ भरधाव कारने धडक दिल्याने पीएचडीचा विद्यार्थी अश्रफ नवाज खान याचा मृत्यू झाला. तीन बहिणींचा तो एकुलता एक भाऊ होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांनाही ब्रेन हॅमरेज झाला आहे. या अपघातात आणखी एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशरफ नवाज खान हा बिहारमधील सिवानचा रहिवासी होता. तो आयआयटीमधून टेक्सटाईल अँड फायबर इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी करत होता आणि वसतिगृहात राहत होता. त्याचा 29 वर्षीय मित्र अंकुर शुक्लाही पीएचडी करत आहे. अशरफच्या मित्रांनी सांगितले की त्याची इंग्लंडमधील एका विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपसाठी निवड झाली होती आणि तो फेब्रुवारीमध्ये जाणार होता.
वडिलांना ब्रेन हॅमरेज, आई हार्ट पेशंट
अशरफच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे त्यांच्या एका नातेवाईकाने सांगितलं. त्याची आई हार्ट पेशंट आहे. तीन बहिणींचा तो एकुलता एक भाऊ होता. अश्रफचे वडील एक छोटे शेतकरी होते त्यांनी आपल्या मुलाला आयआयटीमध्ये पाठवण्यासाठी खूप कष्ट केले. आपल्या मुलासोबत दिल्लीत राहावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. याशिवाय दोन बहिणींचा अभ्यास सुरू असून एका बहिणीचे लग्न झाले आहे.
डीसीपी दक्षिण पश्चिम मनोज सी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशरफ आणि त्याचा मित्र रस्ता क्रॉस करत असताना एका कारने त्यांना धडक दिली. दोन्ही विद्यार्थी आयआयटी दिल्लीतून पीएचडी करत आहेत. अशरफ नवाज खान यांचा सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अंकुर शुक्ला यांच्यावर मॅक्स हॉस्पिटल साकेत येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांना काही अंतरावर कार सापडली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"