आयआयटी दिल्लीसह तीन विद्यापीठांच्या वेबसाइट हॅक, लिहिले पाकिस्तान झिंदाबाद

By admin | Published: April 25, 2017 07:12 PM2017-04-25T19:12:48+5:302017-04-25T19:39:41+5:30

देशातील आघाडीच्या शिक्षणसंस्थांच्या संकेतस्थळांवर पाकिस्तानी हॅकर्सकडून सायबर हल्ला झाला आहे. आयआयटी दिल्ली

IIT Delhi, three universities websites hacked, wrote Pakistan Zindabad | आयआयटी दिल्लीसह तीन विद्यापीठांच्या वेबसाइट हॅक, लिहिले पाकिस्तान झिंदाबाद

आयआयटी दिल्लीसह तीन विद्यापीठांच्या वेबसाइट हॅक, लिहिले पाकिस्तान झिंदाबाद

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,  दि. 25 - देशातील आघाडीच्या शिक्षणसंस्थांच्या संकेतस्थळांवर पाकिस्तानी हॅकर्सकडून  सायबर हल्ला झाला आहे. आयआयटी दिल्ली, दिल्ली विद्यापीठ आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठ या तीन विद्यापीठांच्या वेबसाईट्स आज हॅक करण्यात आल्या असून, त्यावर पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा देण्यात आली आहे, तसेच काश्मीरमधील फुटीरतावाद्यांच्या समर्थनार्थ मजकूर टाकण्यात आला आहे. पाकिस्तानशी संबंधित असलेल्या हॅकर्सनी पीएचसी अशी आपली ओळख सांगितली आहे. 
प्रथमदर्शनी पाकिस्तानी हॅकर्स वाटणाऱ्या या हॅकर्सनी साइट हॅक करून भारत सरकार आणि भारतीय जनतेला पत्रक उद्देशून एक पत्रक साइटवर टाकले आहे. भारत सरकार आणि भारतीय जनतेसाठी हे शुभेच्छा पत्र, तुमचे तथाकथित हिरो असलेले भारतीय सैनिक काश्मीरमध्ये काय करत आहेत, हे तुम्हाला ठावूक आहे का? ते निष्पाप सर्वसामान्य काश्मिरींना ठार मारत आहेत., अशा आशयाचा संदेश आयआयटी दिल्लीच्या संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. तर इतर दोन विद्यापीठांच्या संकेतस्थळांवरही असाच मजकूर टाकण्यात आला आहे. या मजकुरासोबत भारतीय सैनिक काश्मिरी जनतेवर अत्याचार करत असल्याचे दोन व्हिडिओही टाकण्यात आले आहेत.  

Web Title: IIT Delhi, three universities websites hacked, wrote Pakistan Zindabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.