IIT पाटणाच्या विद्यार्थ्यांना जबरदस्त प्लेसमेंट मिळाले; कंपन्यांनी ६० लाखांपर्यंतचे पॅकेज दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:20 IST2024-12-19T15:17:04+5:302024-12-19T15:20:54+5:30
IIT पाटणा येथे २०२५ च्या प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले. पहिल्या टप्प्यात २०७ जॉब ऑफर प्राप्त झाल्या आहेत.

IIT पाटणाच्या विद्यार्थ्यांना जबरदस्त प्लेसमेंट मिळाले; कंपन्यांनी ६० लाखांपर्यंतचे पॅकेज दिले
IIT पाटणामध्ये २०२५ चा प्लेसमेंट सीझन सुरु झाले आहे, येथील विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात मोठमोठ्या पॅकेजेससह मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. या प्लेसमेंट सत्रात एकूण २०७ विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत, यामध्ये ५८ प्री-प्लेसमेंट ऑफर देखील आहेत. या वर्षी पहिल्या टप्प्यात, IIT पटणाच्या विद्यार्थ्यांना एकूण २०७ जॉब ऑफर मिळाल्या आहेत आणि सरासरी वार्षिक पॅकेज २५.५२ लाख रुपये ठेवण्यात आले आहे.
आयआयटी पाटणाच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्लेसमेंट खूप यशस्वी ठरले आहे. येथील १५ हून अधिक विद्यार्थ्यांना ६० लाखांहून अधिक वार्षिक पॅकेज मिळाले आहे. याव्यतिरिक्त, १२ विद्यार्थ्यांना जपानमधील आघाडीच्या कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय नोकरीच्या ऑफर देखील प्राप्त झाल्या आहेत, यामुळे संस्थेची वाढती आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा दिसून येते.
पहिल्या टप्प्यातील प्लेसमेंटमध्ये या प्रमुख कंपन्यांकडून मिळालेल्या ऑफर:
गुगल- १३ ऑफर्स
टूरिंग- ११ ऑफर
मायक्रोसॉफ्ट, आरआय लिमिटेड, टायगर ॲनालिटिक्स- ९-९ ऑफर
फ्लिपकार्ट- ७ ऑफर
एक्सेंचर- ६ ऑफर
सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, डेटा सायन्स, बिझनेस ॲनालिटिक्स, कन्सल्टिंग आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट यासह विविध महत्त्वाच्या प्रोफाइलसाठी या प्लेसमेंट सत्रात विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत. याशिवाय काही विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय नोकरीच्या ऑफरही मिळाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय जॉब ऑफर
IIT पाटणाच्या विद्यार्थ्यांना Accenture Japan, Sakata Incorporation आणि NTT-TX यासह आघाडीच्या जपानी कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाल्या आहेत. यामुळे आता आयआयटी पाटणाचे नाव आता जागतिक स्तरावर ओळखले जात आहे. आता पाटणा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनत आहेत.