रोजगार गुणवत्तेमध्ये आयआयटीचा दर्जा खाली! क्यूएस रँकिंग; पहिल्या २00 संस्थांमध्ये फक्त मुंबई व दिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:09 AM2017-09-15T01:09:54+5:302017-09-15T01:12:47+5:30
उच्च शिक्षण क्षेत्रातले प्रख्यात आंतरराष्ट्रीय नेटवर्क क्वेकेरली सायमंडस (क्यूएस) च्या ताज्या एम्प्लॉएबल रँकिंगमधे भारतातील ५ आयआयटी व १ आयआयसी तसेच दिल्ली विद्यापीठाच्या स्नातकांचा दर्जा गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखी खाली गेला आहे. जगातल्या नोकरीलायक गुणवत्तेच्या पहिल्या २00 उच्च शिक्षण संस्थांमधे केवळ मुंबई आणि दिल्ली आयआयटीचा समावेश आहे.
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : उच्च शिक्षण क्षेत्रातले प्रख्यात आंतरराष्ट्रीय नेटवर्क क्वेकेरली सायमंडस (क्यूएस) च्या ताज्या एम्प्लॉएबल रँकिंगमधे भारतातील ५ आयआयटी व १ आयआयसी तसेच दिल्ली विद्यापीठाच्या स्नातकांचा दर्जा गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखी खाली गेला आहे. जगातल्या नोकरीलायक गुणवत्तेच्या पहिल्या २00 उच्च शिक्षण संस्थांमधे केवळ मुंबई आणि दिल्ली आयआयटीचा समावेश आहे.
गेल्या वर्षी या दोन आयआयटीचे रँकिंग पहिल्या १५0 संस्थांमधे होते. यंदा या कसोटीते या दोन्ही आयआयटी एक पायरी खाली आल्या आहेत. भारतात १00 पैकी फक्त ४0 इंजिनीअर्स नोकरीसाठी गुणवत्तेच्या लायकीचे आहेत, असे विधान मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले होते. आता ते प्रमाण आणखी खाली घसरले असावे.
क्यूएसच्या ताज्या रँकिंग्जमधे आयआयटी खरगपूर व आयआयटी मद्रासचा समावेश गतवर्षी जगातल्या पहिल्या ८१ ते ९0 व १0१ ते २00 च्या दरम्यान होता. यंदाच्या रँकिंगमधे या दोन्ही संस्था २0१ ते २५१ मध्ये आहेत. म्हणजेच त्या मागे पडल्या आहेत. गतवर्षी आयआयटी कानपूर व दिल्ली विद्यापीठाचा समावेश २0१ ते २५0 प्रवर्गात होता. यंदा तो अनुक्रमे ३0१ ते ५00 व २0१ ते २५0 प्रवर्गात आहे. गेल्या वर्षी क्यूएस रँंकिंगमधे जगातल्या ३00 संस्थांचा समावेश होता. त्यामुळे मुंबई विद्यापीठ व आयआयसी (बंगळुरू) त्यात नव्हते. जागतिक स्तरावर स्नातकांची नोकरीलायक गुणवत्ता, नोकरीची शक्यता तसेच उच्च शिक्षण संस्था व विद्यापीठांच्या यशाची तुलना करून उपयुक्त मानदंडानुसार क्यूएस ग्रॅज्युएट एम्प्लॉयबिलिटी रँकिंग्ज तयार केले जातात. यंदाच्या रँकिंग्जमधे अॅल्युमिनी आऊ टकम इंडिकेटरच्या प्रतिक्षेत २५ टक्के तर एम्प्लॉयर स्टुडंटस कनेक्शन रेशोमध्ये १0 टक्के घट आहे. तसेच क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्जमधे एम्प्लॉयर रेप्युटेशन इंडेक्स २0१८ च्या बदलांनाही दर्शवण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठ मागेच
यंदाच्या क्यूएस रँकिंगमधे जगातल्या ४९५ संस्थांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन असल्याने मुंबई विद्यापीठाचा २0१ ते २५0 प्रवर्गात तर आयआयसी बंगळुरूचा ३0१ ते ५00 प्रवर्गात समावेश आहे.