आयआयटी, आयआयएमही सोडतात विद्यार्थी

By Admin | Published: August 17, 2016 04:38 AM2016-08-17T04:38:35+5:302016-08-17T04:38:35+5:30

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी लक्षावधी विद्यार्थी

IITs, students leave IIM | आयआयटी, आयआयएमही सोडतात विद्यार्थी

आयआयटी, आयआयएमही सोडतात विद्यार्थी

googlenewsNext

बंगळुरू : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी लक्षावधी विद्यार्थी प्रचंड धडपडत असताना या संस्थेतील शिक्षण मध्येच सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही प्रमाणही काही कमी नाही.
मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी दाखविलेल्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०१६ या कालावधीत देशातील १६ आयआयटीमधूनच सोडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १,७८२ तर १३ आयआयएमला अभ्यासक्रम पूर्ण न करताच निरोप दिलेल्यांची संख्या १०४ आहे. सन २०१५-२०१६ मध्ये आयआयएम-बंगळुरूचा मध्येच चार विद्यार्थ्यांनी निरोप घेतला तर हीच संख्या त्याआधीच्या वर्षी दोन होती.
या प्रतिष्ठित संस्थेत शिकत असताना मध्येच शिक्षण सोडू नये, म्हणून सरकार अनेक उपाय योजत असल्याची माहिती
पांडे यांनी दिली होती. विद्यार्थ्यांना शैक्षणिक पातळीवर अगदी सुरवातीच्या टप्प्यातच पाठिंबा आवश्यक असतो. शिक्षणाचे दडपण हलके करण्यासाठी त्यांना मदतही केली जाते, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: IITs, students leave IIM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.