भातकुडगाव परिसरात अवैध वृक्षतोड
By admin | Published: May 23, 2016 12:41 AM2016-05-23T00:41:37+5:302016-05-23T01:15:18+5:30
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव व सामनगाव हद्दीत वनविभागाच्या जमिनीतून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून, वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ वनक्षेत्रातील मोठमोठी झाडे तोडून त्याची विक्री करण्यात येते़ या परिसरात साग, निंब, भेंडी यासह विविध वृक्षांची गेल्या तीन ते चार वर्षांत मोठी तोड झाली आहे़ रात्रीच्या सुमारास ही वृक्षतोड केली जाते़ ग्रामस्थांनी याबाबत तक्रार करूनही वनविभाग दखल घेत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़
Next