स्वत:चे एटीएम कार्ड दुसऱ्याला वापरण्यास देणे बेकायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:52 PM2018-06-07T23:52:08+5:302018-06-07T23:52:08+5:30
अनेक जण आपले एटीएम कार्ड आणि त्याचा पिन क्रमांक दुसºयाला देतात आणि पैसे काढून आणायला सांगतात. पण तसे करणे बेकायदा आहे, हे न्यायालयाने मान्य केले आहे.
बंगळुरू : अनेक जण आपले एटीएम कार्ड आणि त्याचा पिन क्रमांक दुसºयाला देतात आणि पैसे काढून आणायला सांगतात. पण तसे करणे बेकायदा आहे, हे न्यायालयाने मान्य केले आहे. प्रत्यक्ष खातेदाराशिवाय अन्य कोणीही एटीएम कार्ड वापरणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
बँकेच्या नियमांनुसार एटीएम कार्ड अन्य कोणालाही वापरता येणार नाही, हे स्टेट बँकेचे म्हणणे मान्य करून बंगळुरूतील न्यायालयाने प्रसूतीसाठी रजेवर असले्या महिलेची याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. बंगळुरूमध्ये राहणाºया वंदना नावाच्या महिलेने प्रसूती रजेवर असताना, आपले पती राजेशकुुमार यांना आपले एटीएम कार्ड देऊ न पैसे काढायला सांगितले होते.
राजेशकुमार घराजवळच्या एटीएममध्ये गेले आणि त्यांनी २५ हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. तसे करताच, वंदना यांच्या मोबाइलवर पैसे काढण्यात आल्याचा मेसेज आला. पण प्रत्यक्षात राजेशकुमार यांना एटीएममधून पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे वंदना व राजेशकुमार यांनी स्टेट बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून याची माहिती दिली. त्यावर तुम्हाला ती रक्कम मिळाली नसेल, तर २४ तासांत ती तुमच्या खात्यात पुन्हा जमा होतील, असे सांगण्यात आले.
पण पैसे खात्यात पुन्हा जमा झालेच नाही. त्यामुळे त्या दोघांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे ही तक्रार केली. त्यावर बँकेने आपला नियम दाखवला आणि तुम्ही बेकायदा पद्धतीने तुमचे कार्ड दुसºया व्यक्तीस दिले होते. त्यामुळे ही रक्कम तुम्हाला पुन्हा मिळू शकणार नाही, असे उत्तर त्यांना दिले. आपण गरोदर असल्याने आपणास प्रत्यक्ष बँकेत वा एटीएममध्ये जाणे शक्य नव्हते, हे वंदना यांचे म्हणणेही बँकेने ऐकून घेतले नाही.
त्यावर या दाम्पत्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तिथे त्यांनी आपली २५ हजार रुपयांची रक्कम बँकेने परत करावी, असा अर्ज केला. या अर्जातही त्यांनी आपण गरोदर असल्याने पैसे काढण्यासाठी कार्ड पतीला दिले होते, हे मान्य केले होते. दरम्यान वंदना यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून संबंधित एटीएम व्यवहाराची माहिती मिळवली.
त्यात त्या दिवशी संबंधित एटीएम कार्डचा वापर करणाºया व्यक्तीस २५ हजार रुपये दिले गेले नाहीत आणि ती रक्कम त्या यंत्रात तशीच राहिली, अशी माहिती मिळाली. सीसीटीव्हीचे फुटेज व माहिती अधिकारातून मिळालेली माहिती वंदना यांनी ग्राहक न्यायालयात सादर केली. (वृत्तसंस्था)
धनादेश द्यायला हवा होता
मात्र बँकेने एटीएम कार्डाविषयीचे नियम न्यायालयात सादर केले. हे कार्ड दुसºयास वापरण्यास देणे तसेच पिन क्रमांक सांगणे बेकायदा असल्याचा हा नियम आहे. तो न्यायालयाने मान्य केला.
एटीएम कार्डाऐवजी पतीला धनादेश द्यायला हवा होता, तसे केले असते तरी आपणास पैस मिळाले असते. पण आपण बेकायदा मार्गाचा अवलंब केला, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे वंदना यांना स्वत:च्या खात्यातील तब्बल २५ हजार रुपयांना मुकावे लागले.