मी निर्दोष ! बलात्कारी राम रहीमची शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 04:45 PM2017-09-25T16:45:57+5:302017-09-25T16:49:02+5:30

पंचकुला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला गुरमीत राम रहीमने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे

I'm innocent! The rapist raped the High Court against Ram Rahim's punishment | मी निर्दोष ! बलात्कारी राम रहीमची शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव

मी निर्दोष ! बलात्कारी राम रहीमची शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव

Next
ठळक मुद्देडेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहेपंचकुला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला गुरमीत राम रहीमने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहेसीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे

चंदिगड - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पंचकुला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला गुरमीत राम रहीमने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. सध्या राम रहीम रोहतक कारागृहात शिक्षा भोगत आहे. 

शिक्षा सुनावण्यात येण्याआधी गुरमीत राम रहीमने न्यायालयासमोर दयेसाठी याचना केली होती. इतकंच काय त्याला रडूही कोसळलं होतं. पण न्यायाधीश जगदीप सिंह यांच्यावर कोणताही फरक पडला नाही. त्यांनी कोणतीही दया माया दाखवली नाही. जगदीप सिंह यांनी निर्णय सुनावताना तिखट शब्दांत सुनावलं की, 'गुरमीतने जंगली जनावरासारखं काम केलं आहे. त्याने आपल्या अनुयायांसोबत असभ्य वर्तन केलं आहे, आणि हे माफी करण्याच्या लायकीचं नाही. दोन्ही पीडित तरुणींना त्याला देवाचा दर्जा दिला होता. त्याने त्यांच्यासोबत हे वर्तन करायला नको होतं'. यावेळी न्यायाधीशांनी नमूद केलं होतं की, 'बलात्कार हा फक्त लैंगिक अत्याचार नाही, तर पीडित तरुणीचं संपुर्ण आयुष्य उद्ध्वस्त करत असतो'. 

न्यायाधीश बोलले होते की, 'राम रहीमने अंधश्रद्धेने त्याच्यावर भरोसा ठेवणा-या साध्वींचा विश्वासघात केला आहे आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं. एक व्यक्ती जो स्वत:ला एका धार्मिक संघटनेचा प्रमुख म्हणतो, त्याचं हे कृत्य देशाच्या पवित्र, अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनांना कलंकित करण्याचं काम करत आहे. त्याच्या या कृत्यामुळे या संस्थांच्या विश्वासार्हतेला गेलेला तडा पुन्हा भरुन निघू शकत नाही'. बलात्कार प्रकरणी दोषी आढललेल्या गुरमीत राम रहीमची दया करण्याची मागणी फेटाळत न्यायाधीशांनी सांगितलं होतं की, 'विनाकारण दया दाखवल्याने न्यायव्यवस्थेचं अधिक नुकसान होईल. तसंच लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वासही कमी होईल'. 

न्यायाधीश जगदीप सिंह यांनी कडक शब्दात सुनावताना न्यायालय वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी असल्याचं सांगितलं होतं. जगदीप सिंह बोलले होते की, 'या शिक्षेमुळे अशाप्रकारची वृत्ती असणा-यांना कडक संदेश मिळेल. सोबतच अशा प्रकारचं कृत्य करण्याआधी दोनवेळा विचार करेल'. 

सीबीआय न्यायालयाचे न्या. जगदीप सिंह यांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतक येथे आणण्यात आले होते. शिक्षा सुनावताच, बाबा राम रहीम धाय मोकलून रडू लागला आणि माफीची मागणी करू लागला होता. ‘माझ्यावर दया दाखवा, मी समाजसेवक आहे,’ असे तो हात जोडून सांगत होता. त्याच्या वकिलांनीही त्याची सजा कमी करावी, अशी मागणी केली, पण शिक्षेत बदल झाला नाही.

बाबा राम रहीमने २00२ साली आपल्या सिरसा आश्रमातील गुहेमध्ये दोन साध्वींवर बलात्कार केले होते. त्याची तक्रार एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी पाठविले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी बाबाने, तसेच काही राजकारण्यांनी अधिकाºयांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता, पण अधिकाºयांनी दबाव झुकारून तपास पूर्ण केला आणि बाबावर खटले दाखल झाले. 

Web Title: I'm innocent! The rapist raped the High Court against Ram Rahim's punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.