IMA Corona Advisory: पुन्हा धडकी भरवतोय कोरोना; IMA नं जारी केली अ‍ॅडव्हायजरी, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 02:13 PM2022-12-22T14:13:32+5:302022-12-22T14:22:10+5:30

भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले 4 रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

IMA Corona Advisory Corona is threatening again wear masks in all public places ima releases advisory | IMA Corona Advisory: पुन्हा धडकी भरवतोय कोरोना; IMA नं जारी केली अ‍ॅडव्हायजरी, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक!

IMA Corona Advisory: पुन्हा धडकी भरवतोय कोरोना; IMA नं जारी केली अ‍ॅडव्हायजरी, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक!

Next

चीन जपानसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार घालायला सुरुवात केली. येथे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचाही तुटवडा भासू लागला आहे. Omicron चा sub-variant BF.7 ने चीनमध्ये कहर केला आहे. भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले 4 रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

आयएमएची अ‍ॅडव्हायजरी अशी -
- सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक आहे.
- सोशल डिस्टंन्सिंग आवश्यक आहे.
- सॅनिटायझर आणि साबणाने हात धुणे आवश्यक आहे.
- राजकीय, सामाजिक सभांना जाणे टाळा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा.
- ताप, घशात खवखव, खोकला अथवा लूज मोशनची समस्या असेल तर तत्काळ डॉक्टरांना दाखवा.
- कोरोना लसिकरण शक्य तेवढ्या लवकर करून घ्या. यात प्रिकॉशनरी डोसचाही समावेश आहे.

अशी आहे जगाची स्थिती -
भारतात गेल्या 24 तासांत 145 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात 4 रुग्णांना BF.7 ची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत चीन, जपान, कोरिया आणि अमेरिकेत तब्बल 5 लाख 37 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. सरकारने एअरपोर्टवर परदेशातून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर जल्दी लवकरच नवी गाइडलाईन जारीकेली जाऊ शकते.
 

Web Title: IMA Corona Advisory Corona is threatening again wear masks in all public places ima releases advisory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.