CoronaVirus News: ...तर आणि तरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव शक्य; IMAच्या अध्यक्षांचा मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:45 IST2021-05-19T15:43:19+5:302021-05-19T15:45:18+5:30
CoronaVirus News: अन्यथा आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचू शकणार नाही; IMAच्या अध्यक्षांकडून धोक्याचा इशारा

CoronaVirus News: ...तर आणि तरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव शक्य; IMAच्या अध्यक्षांचा मोलाचा सल्ला
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३ लाखांच्या खाली आला आहे. मात्र तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जी. ए. जयालाल यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
अतूट प्रेम! पत्नीच्या मृत्यूनंतर तासाभरातच पतीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दिला दोघांना मुखाग्नी
गेल्या २४ तासांत देशात ४ हजार ५२९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. देशात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यातच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकादेखील कायम आहे. 'या परिस्थितीतून बाहेर पडण्याच एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लसीकरण,' असं मत जयालाल यांनी व्यक्त केलं. आपण मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं लसीकरण करायला हवं. तसं न केल्यास तिसऱ्या लाटेपासून आपला बचाव होऊ होणार नाही, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.
चिंताजनक! भारतातील तब्बल ९८ टक्के लोकसंख्या अद्यापही कोरोनाच्या धोक्याच्या छायेत, आतापर्यंत केवळ २ टक्के लोकांनाच संसर्ग
मोठ्या समूहांचं लसीकरण वेगानं करायला हवं. त्यासाठी केंद्र सरकारनं अधिकाधिक लसी खरेदी करायला हव्यात. सरकारनं घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची सुविधा सुरू करायला हवी. देशात आतापर्यंत १८ कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. हा आकडा वेगानं वाढायला हवा, असं डॉ. जयालाल म्हणाले. देशात कोरोनामुळे आतापर्यंत २ लाख ८३ हजार २५८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्याच्या घडीला देशात ३२ लाख २६ हजार ७१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.