वाद पेटला! IMAनं बाबा रामदेवांना पाठवली 1000 कोटींची नोटीस; 15 दिवसांत मागायला सांगितली लेखी माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 12:46 PM2021-05-26T12:46:42+5:302021-05-26T12:52:59+5:30
नोटिशीत म्हणण्यात आले आहे, की बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली जाईल.
नवी दिल्ली - अॅलोपॅथी आणि डॉक्टरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून योगगुरू बाबा रामदेव चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने बाबा रामदेव यांना 1000 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविली आहे. यात बाबा रामदेवांना पुढील 15 दिवसांत त्यांच्या वक्तव्याचे खंडन करणारा व्हिडिओ जारी करून लेखी माफी मागायला सांगितले आहे. (IMA sends defamation notice of RS 1000 cr to Baba Ramdev and ask for written apology)
नोटिशीत म्हणण्यात आले आहे, की बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली जाईल. याच बरोबर रामदेव यांना 72 तासांच्या आत, कोरोनिल किटची दिशाभूल करणारी जाहिरातही सर्व ठिकाणांहून हटविण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनिल कोविड व्हॅक्सीननंतर होणाऱ्या साइड इफेक्ट्सवर प्रभावी असल्याचा दावा, या जाहिरातीत करण्यात आला आहे.
IMA Uttarakhand sends a defamation notice of Rs 1000 cr to Yog Guru Ramdev. The notice states that if he doesn't post a video countering the statements given by him and tender a written apology within the next 15 days, then a sum of Rs 1000 crores will be demanded from him. pic.twitter.com/c7RlLInXi3
— ANI (@ANI) May 26, 2021
अरेस्ट तर कोणाचा बापही करू शकत नाही, बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल
रामदेवांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य -
काही दिवसांपूर्वीच बाबा रामदेव एका कार्यक्रमात म्हणाले होते, अॅलोपॅथी ओषधं घेतल्याने लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अॅलोपॅथी स्टुपीड आणि दिवाळखोर सायन्स असल्याचेही बाबा रामदेव यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यांवरून वाद वाढल्यानंतर आणि केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या भूमिकेनंतर रामदेव यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते.
Yoga guru claiming Allopathy as stupid science. This pandemic brings new shock every day. pic.twitter.com/1W9ojVOIGY
— Subhasree Ray (@DrSubhasree) May 21, 2021
बाबा रामदेव यांच्या वागणूकीवर संतापले हंसल मेहता, हा 'इडियट' माणूस...
रामदेवांनी विचारले 25 प्रश्न -
बाबा रामदेवांनी एक पत्र काढून हेपटाइटिस, लिव्हर सोयरायसिस, हार्ट एनलार्जमेंट, शुगर लेवल 1 आणि 2, फॅटी लिव्हर, थायरॉइड, ब्लॉकेज, बायपास, मायग्रेन, पायरिया, निद्रानाश, स्ट्रेस, ड्रग्स अॅडिक्शन, आदिंवरील कायम उपचारांबद्दल प्रश्न विचारले. एवढेच नाही, तर अमेरिकेचे डॉक्टर बोलतात, डब्ल्यूएचओ म्हणते, तेव्हा का नाही बोलत कोणी? मी जर डॉक्टरांचा आणि मेडिकल सायन्सचा सन्मान करतो, तर तुम्ही आयुर्वेदाचा सन्मान का करत नाही? आयुर्वेदावर टीका का केली जाते, शिव्या का दिल्या जातात? फार्मा कंपन्या खूप आहेत, मग डॉक्टर त्यांचे बळी का ठरत आहेत. डॉक्टर तर फार्मा कंपनीचा प्रतिनिधी नसतो, असेही बाबा रामदेव म्हणाले होते.
ॲलोपॅथीला दिवाळखोरी ठरवणं दुर्दैव -
"कोरोनावरील उपचारांमध्ये ॲलोपॅथी औषधाला तमाशा, निरुपयोगी आणि दिवाळखोर ठरवणे अतिशय दुर्दैवी आहे. आज लाखो लोक ॲलोपॅथीमुळेच कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज देशात कोरोनाचा मृत्यूदर फक्त 1.13 टक्के आणि बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के एवढे आहे. यामागे ॲलोपॅथी आणि डॉक्टरांचे सर्वात मोठे योगदान आहे. उपचारांच्या सध्याच्या प्रक्रियेला तमाशा संबोधने ॲलोपथी उपचारांचीच नव्हे, तर डॉक्टरांच्या आत्मविश्वासाला धक्कदा पोहोचविण्यासारखे आहे. तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणावर मी नाराज आहे," असे रोखठोक मत डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे.