"आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मान करतो"; पतंजली योगपीठानं फेटाळले बाबा रामदेव यांच्यावरील आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 11:08 AM2021-05-23T11:08:43+5:302021-05-23T11:10:31+5:30

कोरोनावरील उपचारपद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. IMA नं केली होती बाबा रामदेव यांच्यावर कारवाईची मागणी.

ima sends legal notice to yogguru baba ramdev regarding viral video on allopathy pantanjali clarifies | "आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मान करतो"; पतंजली योगपीठानं फेटाळले बाबा रामदेव यांच्यावरील आरोप

"आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मान करतो"; पतंजली योगपीठानं फेटाळले बाबा रामदेव यांच्यावरील आरोप

Next
ठळक मुद्देकोरोनावरील उपचारपद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं.IMA नं केली होती बाबा रामदेव यांच्यावर कारवाईची मागणी.

ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. कोरोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरलं. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही फेल ठरल्याचं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. कोरोनावरील उपचारपद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्याचंही ते म्हणाले होते. विशेष म्हणजे रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता, ॲलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावाही त्यांनी केला. इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी केलेल्या दाव्यावरून संताप व्यक्त केला. तसंच, बाबा रामदेव यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणीही संघटनेच्या वतीने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे करण्यात आली होती. दरम्यान, यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठानं हे आरोप फेटाळून लावले.

यानंतर बाबा रामदेव यांच्या हरिद्वार येथील पंतजली योगपीठ ट्रस्टकडून एक निवेदन जारी करण्यात आलं. "या महासाथीमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत जे दिवस-रात्र काम करत आहेत अशा डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बाबा रामदेव सन्मान करतात. ते कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या अन्य सदस्यांना व्हॉट्सअॅपवरील आलेला संदेश वाचून दाखवत होते," असं त्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. 

"बाबा रामदेव हे आधुनिक विज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धतीनं उपचार करणाऱ्यांविरोधात कोणत्याही पद्धतीचा चुकीचा विचार नाही. त्यांच्या विरोधात केले जाणारे आरोप निरर्थक आणि अयोग्य आहेत," असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. पतंजली योगपीठाचे महासचिव आचार्य बाळकृष्ण यांची स्वाक्षरी असलेलं निवेदन पतंजली योगपीठाकडून जारी करण्यात आलं आहे. 

IMA कडून कारवाईची मागणी

इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या व्हायरल व्हिडिओसंदर्भात परिपत्रक जारी केलं होतं. त्यामध्ये, बाबा रामदेव यांनी केलेला दावा स्वीकारून आधुनिक उपचारपद्धती बंद करावी.  अन्यथा बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, आपत्ती व्यवस्थापन महामारी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करावा, असंही मेडिकल असोसिएशन संघटनेनं आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना उद्देशून म्हटलं. इंडियन मेडिकल असोसिएशननं रामदेवबाबा यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. आरोप, वक्तव्ये सिद्ध करा किंवा माफी मागा अन्यथा ॲलोपॅथीची बदनामी केल्याबद्दल कोर्टात जाऊ असा इशारा दिला होता.
 

Web Title: ima sends legal notice to yogguru baba ramdev regarding viral video on allopathy pantanjali clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.