IMD Rain Alert: महाराष्ट्रासह या राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार, डोंगराळ भागात अतिवृष्टीचा इशारा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 05:16 PM2022-09-13T17:16:01+5:302022-09-13T17:16:19+5:30
IMD Rainfall Alert: हवामान विभागाने अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
Weather Update Today: सध्या देशातील अनेक राज्यांना पावसाने झोडपून काढलंय. या महिन्यात काही भागात सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने आता येत्या काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेश आणि त्याच्या लगतच्या राज्यांवर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
अनेक राज्यात मुसळधार
काही डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. IMD अपडेटनुसार, 14 ते 17 सप्टेंबर या कालावधीत वायव्य भाग, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टी होणार आहे. बंगाल आणि अरेबिया गटात ढगांचा समूह असून, इकडे महाराष्ट्रापासून गोवा किनारपट्टीपर्यंत ऑफ शोर मान्सून ट्रफ आहे. गेल्या 24 तासांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
झारखंडमध्ये दिलासा
IMD ने सांगितले की, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गेल्या 24 तासांपासून सतत पाऊस पडत आहे. पण, मंगळवारी दुपारनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात पुराचे वृत्त नाही. दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या आग्नेय मध्य प्रदेशावरील खोल दाब जवळजवळ वायव्येकडे सरकला आहे. त्यामुळे झारखंडमध्ये मंगळवारी दुपारनंतर संततधार पावसापासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.