‘तंबाखूच्या विक्रीवर त्वरित बंदी आणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:34 AM2018-02-05T01:34:41+5:302018-02-05T01:34:52+5:30

गुटखा, पान मसाला, खैनी यासारख्या चघळण्याच्या तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बंदीची त्वरित अंमलबजावणी करा, अशी मागणी कर्करोगतज्ज्ञांना केंद्र सरकारला केली आहे.

'Immediate ban on Tobacco sale' | ‘तंबाखूच्या विक्रीवर त्वरित बंदी आणा’

‘तंबाखूच्या विक्रीवर त्वरित बंदी आणा’

Next

कोलकाता : गुटखा, पान मसाला, खैनी यासारख्या चघळण्याच्या तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बंदीची त्वरित अंमलबजावणी करा, अशी मागणी कर्करोगतज्ज्ञांना केंद्र सरकारला केली आहे.
तोंडाचा कर्करोग होण्याच्या नव्वद टक्के घटना चघळण्याच्या तंबाखुजन्य पदार्थांमुळे होतात यावर कर्करोगतज्ज्ञांचे एकमत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या पदार्थांवर घातलेल्या बंदीचा निर्णय सरकारने अमलात आणला तर तोंडाच्या कर्करोगाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवता येईल असे कर्करोगतज्ज्ञांनी म्हटले आहे. कर्करोगतज्ज्ञ डॉ. सौरव दत्ता यांनी म्हणाले तंबाखुमुळे दरवर्षी १० लाख लोक मरण पावतात. त्यामुळे तंबाखुजन्य पदार्थांच्या सर्रास विक्रीवर बंदी आणली पाहिजे.
घरातील माणसाच्या कर्करोगाने बळी गेल्याने कुटुंबाची घडी विस्कळीत होते. लाखो कुटुंबे त्यामुळे उद््ध्वस्त झाली आहेत. तंबाखुचा वापर कमी झाल्यास यावर नियंत्रण मिळविता येईल असे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी म्हणाले.
संबंध हेल्थ फाऊंडेशनचे विश्वस्त संजय शेठ यांनी सांगितले की, भारतामध्ये २६.७ कोटी लोक तंबाखुजन्य पदार्थांचा वापर करतात असा गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. दररोज ५५०० मुले तंबाखुजन्य पदार्थ वापरतात. तंबाखुचा वापर करणाºयांपैकी दोन तृतीयांश लोक अकाली मरण पावतात असेही या सर्वेक्षणातील निष्कर्षांत म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
>तंबाखूवर नियंत्रण हवे
एड्स, मलेरिया, टीबी या रोगांपेक्षा कर्करोगाने मरण पावणाºयांची संख्या अधिक आहे. याचा विचार करुन तंबाखुचे पीक घेण्यावरही केंद्र सरकारने नियंत्रण राखण्याची वेळ आली आहे. तंबाखुचे पीक कमी केल्याने जे नुकसान होईल, त्याची भरपाई अन्य मार्गांनी करता येईल, असेही त्रिवेदी म्हणाले.

Web Title: 'Immediate ban on Tobacco sale'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.