न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी: तुरळक दगडफेक, हॉटेल कर्मचारी जखमी प्रचंड तणावात शिवाजीरोड अतिक्रमण मुक्त
By admin | Published: March 23, 2016 12:11 AM2016-03-23T00:11:41+5:302016-03-23T00:11:41+5:30
जळगाव : न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत महापालिकेने शिवाजीरोडवरील फळे विक्रेत्यांची अतिक्रमणे मंगळवारी पोलीस बंदोबस्तात काढली. पोलीस ताफ्यालाही न जुमानता हॉकर्सने आपल्या जागा अडवून ठेवल्याने शेवटी जप्ती कारवाई सुरू झाली. यावर संतप्त होकर्स सैरभैर होऊन पळापळ व तुरळक स्वरूपाची दगडफेक झाली. यात एक हॉटेल कर्मचारी जखमी झाला. या प्रकारामुळे शिवाजीरोड, जुना कापड बाजार परिसर व सुभाष चौकातही काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Next
ज गाव : न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत महापालिकेने शिवाजीरोडवरील फळे विक्रेत्यांची अतिक्रमणे मंगळवारी पोलीस बंदोबस्तात काढली. पोलीस ताफ्यालाही न जुमानता हॉकर्सने आपल्या जागा अडवून ठेवल्याने शेवटी जप्ती कारवाई सुरू झाली. यावर संतप्त होकर्स सैरभैर होऊन पळापळ व तुरळक स्वरूपाची दगडफेक झाली. यात एक हॉटेल कर्मचारी जखमी झाला. या प्रकारामुळे शिवाजीरोड, जुना कापड बाजार परिसर व सुभाष चौकातही काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हायकोर्टाच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या संभ्रमामुळे शिवाजीरोडवरील फळविक्रेते व मसाला विक्रेत्या हॉकर्सने सोमवारी पुन्हा शिवाजीरोडवर आपल्या गाड्या लावल्या होत्या. या संदर्भातील चर्चेतून तोडगा न निघाल्याने दुपारी १२.३० वाजेपासून महापालिका आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त प्रदीप जगताप, अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे व २० ते २५ पोलिसांचा ताफा असा लवाजमा शिवाजीरोडवर कारवाईसाठी रवाना झाला. प्रचंड तणावातही चर्चेला प्राधान्यशिवाजीरोडवर आल्यावर तेथे अधिकारी वर्गाने पुन्हा हॉकर्सशी संवाद साधला मात्र त्यातील काही जण तावातावाने बोलत होते. हेल्मेटधारी अतिक्रमण विभागातील कर्मचारी, लाठ्याकाठ्या घेऊन मैदानात उतरलेले पोलीस असा ताफा असताना हॉकर्स त्यांना जुमानत नव्हते. या दरम्यान गाडीवरून अतिक्रमण काढून बी.जे. मार्केटवरील जागेवर हॉकर्सने जावे असे आवाहनी सुरूच होते. कारवाईन तणाव व फळे फेकलीसमजाविण्याचा प्रयत्न करूनही हॉकर्स ऐकत नसल्याने अखेर जप्तीच्या कारवाईला सुरुवात झाली. यामुळे हॉकर्स सैरभैर झाले. काहींनी आरडाओरड करत फळे फेकण्यास सुरुवात केली. संपूर्ण रस्त्यावर प्रचंड आरडाओरड करत हॉकर्स पळत होते. बाजारात आलेले नागरिकही यामुळे भीतीने पळायला लागले. या भागातील दुकानेही पटापट बंद झाली. आंबेडकर मार्केटच्या मागील गल्लीकडे व जुना कापड बाजार रोडकडे हॉकर्स पळायला लागले. त्यांच्यामागे पोलीसही होते. यामुळे सुभाष चौकाकडेही पळापळ सुरू झाली. जुना कापड बाजार रस्त्यावरील दुकानेही यामुळे बंद झाली.