दुष्काळ निवारणासाठी फडणवीस यांच्या निर्णयांची राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 04:33 AM2018-09-13T04:33:36+5:302018-09-13T04:33:50+5:30
दुष्काळ संपवण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उचललेल्या पावलांचे अनुकरण साऱ्या देशभर करण्याची भाजपची इच्छा आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : कृषी उत्पादन वाढविणे, जुन्या जलाशयांचे पुनरुज्जीवन, तसेच दुष्काळ संपवण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उचललेल्या पावलांचे अनुकरण साऱ्या देशभर करण्याची भाजपची इच्छा आहे. त्याद्वारे शेतकºयांच्या गळ्यातले ताईत बनणे शक्य होईल, असे या पक्षाला वाटते.
मात्र त्यासाठी शेतकºयांत जाऊन या योजनांची माहिती देण्यासाठी पक्षाला मोठी मोहीम राबवावी लागेल. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांची अभिनव योजना महाराष्ट्रातील १५ हजारांहून गावांत राबविण्यात येईल. फडणवीस यांनी कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी चांगले कार्य केले आहे.
>शिवसेना व भाजप एकत्र लढणार
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पूर्वीच्या तुलनेत आम्ही दोन-तीन जागा जास्तच जिंकू, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला. शिवसेनेची भाजपला साथ नसल्यास हिंदूंच्या मतांत विभागणी होण्याची शक्यता वाटते का? या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही एकमेकांच्या साथीनेच आगामी लोकसभा निवडणुका लढविणार आहोत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ही गोष्ट वारंवार स्पष्ट केली आहे.