केजरीवालांनी 'करून दाखवलं', स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार 'दिल्ली सरकार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:36 PM2019-02-06T16:36:39+5:302019-02-06T16:54:30+5:30
राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतीमालाला भाव देणार आहे.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतीमालाला भाव देणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली सरकार घेईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणून गहू या पिकासाठी 2616 रुपये तर धान्यासाठी 2667 रुपये किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपी लागू करणार असल्याचे प्रस्तावित आहे, असे म्हटले आहे. तसेच याबाबत जनेतेच्या सूचनांचेही स्वागत केले जाईल, असेही केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे. त्यासाठी kisansuggestions@gmail.com किंवा jdadev.delhi@nic.in या ई-मेल आयडीवर आपल्या सूचना पाठविण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, केजरीवाल यांनी एका चार्टद्वारे गहू आणि धान्य पिकांची हेक्टरवर वर्गवारी करून हे दर काढले आहेत.
Ahead of general elections, AAP govt moves ahead with Implementation of Swaminathan committee recommendation for farmers, plans to hike MSP for farmers in Delhi, seeks suggestion. pic.twitter.com/sPKhjql1Zr
— ASHUTOSH MISHRA (@ashu3page) February 6, 2019