उत्तर प्रदेशात दलित, मागासांच्या नव्या आदर्शांना आले महत्त्व
By admin | Published: June 14, 2017 01:41 AM2017-06-14T01:41:54+5:302017-06-14T01:41:54+5:30
उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत येताच दलित आणि मागासवर्गीय जातींच्या नव्या दिवंगत थोर आदर्शांना (आयकॉन्स) खूपच महत्व प्राप्त झाले आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत येताच दलित आणि मागासवर्गीय जातींच्या नव्या दिवंगत थोर आदर्शांना (आयकॉन्स) खूपच महत्व प्राप्त झाले आहे. भाजपने दलित व मागासवर्गीय जातींचे जाणीवपूर्वक वेगळे व नवे आदर्श समोर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
राजा सुहेलदेव, राणी झलकारी बाई आणि लखन पासी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम, रमाबाई आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांची जागा घेतल्याचे दिसत आहे. राम मनोहर लोहिया यांनाही मागे ढकलले आहे. भाजप सरकारने नव्या आदर्शांचे पुतळेच उभारायचे ठरवले आहे. त्यांच्यावरील धडे शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकात समाविष्ट केले जाणार आहेत.
सुहेलदेव आणि झलकारी बाई यांची कामगिरी इतिहासकारांनी हेतूत: दुर्लक्षित केली. या इतिहासकारांनी इतिहासाचा विपर्यास केला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वसपाची सत्ता असताना जी स्मारके बांधण्यात आली होती तेथे राजा सुहेलदेव यांचे पुतळे बसवले जातील, अशी घोषणा मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केली.
बसपचा आक्षेप
बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. सी. मिश्र यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गेल्या बुधवारी योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ न, डॉ. आंबेडकर आणि कांशीराम यांच्या स्मारकांत बसवण्यात येणाऱ्या नव्या पुतळ््यांना विरोध दर्शवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकल व कांशीराम या दलित नेत्यांची जिथे स्मारके आहेत, तिथे अतिक्रमण करण्याऐवजी भाजपने मागासवर्गीयांच्या आदर्श नेत्यांसाठी स्वतंत्र स्मारके बांधावीत, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.