भारताचे महत्त्व अमान्य असलेले दुही माजवितात - भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 04:59 AM2018-02-22T04:59:54+5:302018-02-22T05:00:02+5:30
जागतिक स्तरावर भारताचे वाढते महत्व ज्यांच्या डोळ््यांना खुपत आहे अशा प्रवृत्ती इतिहासाचे विकृतीकरण करुन समाजात दुफळी माजवत आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी येथे केला.
वाराणसी : जागतिक स्तरावर भारताचे वाढते महत्व ज्यांच्या डोळ््यांना खुपत आहे अशा प्रवृत्ती इतिहासाचे विकृतीकरण करुन समाजात दुफळी माजवत आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी येथे केला.
भागवत म्हणाले की, १८५७च्या स्वातंत्र्यसमराच्या आधीही देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये ऐक्य व बंधुभाव होता. हे दोन्ही समाज नेहमीच एकत्र होते. मात्र १९०५ साली मुस्लीम लिगची स्थापना झाली आणि त्यानंतर देशामध्ये मोठ्या प्रमाणात मुलतत्ववादाचा प्रसार सुरू झाला. अजूनही या प्रवृत्ती समाजात मूळ धरून आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील ट्रेड फॅसिलिटेशन सेंटरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजिलेल्या कार्यक्रमात स्वयंसेवकांसमोर बोलताना मोहन भागवत यांनी देशविघातक कार्य करणाºयांच्या विरोधात जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. रा. स्व. संघ हा सामाजिक सलोखा वाढावा, यासाठीच नेहमी प्रयत्नशील राहिला आहे. ज्याच्या मनात अहंकार नाही असे स्वयंसेवकच आपल्या कार्याद्वारे देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात. या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ नेते
ओम माथुर, महेंद्रनाथ पांडे, सुनील बन्सल, लक्ष्मण आचार्य आदी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
संघ स्वयंसेवकांनी एकजुटीने राहावे आणि संघभावनेने कार्याला वाहून घ्यावे. स्वयंसेवकांनी निस्वार्थी बुद्धीने कार्यरत राहावे, असे सांगून, आपण संघटनेपेक्षा मोठे आहोत अशी भावना तुमच्या मनात निर्माण होता कामा नये. संघाच्या स्वयंसेवकांनी सत्याचा मार्ग अनुसरावा व आपल्या मुल्यांशी कधीही प्र्रतारणा करु नये, असे स्वयंसेवकांना ऐकवले.