हातकणंगलेत यड्रावकर गटाच्या भूमिकेला महत्त्व
By admin | Published: February 3, 2017 12:19 AM2017-02-03T00:19:54+5:302017-02-03T00:19:54+5:30
खोची : हातकणंगले तालुक्यात शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. तालुक्यात कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या चार जिल्हा परिषद मतदारसंघांत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या संदर्भातील यड्रावकर गटाची भूमिका बैठक घेऊन स्पष्ट केली जाईल, असे गटांतील विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
Next
ख ची : हातकणंगले तालुक्यात शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. तालुक्यात कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या चार जिल्हा परिषद मतदारसंघांत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या संदर्भातील यड्रावकर गटाची भूमिका बैठक घेऊन स्पष्ट केली जाईल, असे गटांतील विश्वसनीय सूत्रांकडून समजले.गेल्या दोन ते अडीच दशकांपासून हातकणंगले तालुक्याच्या राजकारणात यड्रावकर गट सक्रीय आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत कार्यरत असणारा यड्रावकर उद्योग समूह कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरलेला आहे. त्यामुळे काही भागात त्यांचा लक्षवेधी प्रभाव आहे. हातकणंगले तालुक्यातील बहुतांशी गावांत त्यांचा स्वतंत्र गट आहे. नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखाना हे त्यांच्या राजकारणातील बैठकीचे प्रमुख केंद्र आहे. कारखान्यात तालुक्यातील असणारे बहुसंख्य कर्मचारी वरील चार मतदारसंघांतील आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत; परंतु त्यांनी हातकणंगले तालुक्यात अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. सध्या राष्ट्रवादी पक्ष हातकणंगले तालुक्यात गतिमान झालेला दिसत नाही. शिरोळमध्ये मात्र सक्रीय झालेला आहे. कॉँग्रेस चार व राष्ट्रवादी तीन असे जिल्हा परिषद मतदारसंघ निवडणूक लढविणार आहेत.हातकणंगलेत मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर युती करण्याच्या प्रयत्नात आहे; परंतु युती होताना दिसत नाही. कॉँग्रेस, भाजप, सेना, जनसुराज्य, ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवक क्रांती आघाडी, कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी (आवाडे गट) या विविध पक्ष, आघाड्या यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युती केल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच गोंधळाची स्थिती पाहावयास मिळत आहे. अशा स्थितीत यड्रावकर गट मात्र जरी राष्ट्रवादीचा असला तरी तो शांतच आहे. त्यांचे होम पिच शिरोळ तालुका आहे. तरीसुद्धा त्यांनी जर हातकणंगलेत सक्रीय होण्याचा प्रयत्न केला, तर दोन-तीन जिल्हा परिषद मतदारसंघांचा निकाल लावू शकतील, इतका गटाचा प्रभाव आहे. यामध्ये प्रामुख्याने कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या मतदारसंघांचा समावेश आहे. यासंदर्भात यड्रावकर गट लवकरच बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करेल, असे माहिती गटातील सूत्रांकडून मिळाली.