महत्वाचे
By admin | Published: February 18, 2015 11:54 PM2015-02-18T23:54:24+5:302015-02-18T23:54:24+5:30
शिवशक्ती सेवा मंडळातर्फे महाप्रसादाचे वितरण
Next
श वशक्ती सेवा मंडळातर्फे महाप्रसादाचे वितरणनागपूर : शिवशक्ती सेवा मंडळाद्वारे कल्याणेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीला प्रसादाचे वितरण करण्यात आले. योगेश त्रिवेदी यांच्या हस्ते कल्याणेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नगरसेवक गिरीश देशमुख, कुमार मसराम, मनीष मेहाडिया आदी उपस्थित होते. वसतिगृहातील मुलांची कुष्ठरोग तपासणीनागपूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नागरी कुष्ठरोग पथकाने कल्पना भवन मुलांचे वसतिगृह, गोरेवाडा येथे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. संजय मानेकर यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठरोग व त्वचेच्या आजाराविषयी माहिती दिली. यावेळी राजेंद्र पाटील उपस्थित होते. माऊंट एव्हरेस्ट शाळानागपूर : सेमिनरी हिल्स येथील माऊंट एव्हरेस्ट उच्च प्राथमिक शाळेत आयोजित स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी उपमहापौर संदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका साधना बरडे, देवराव वैद्य, प्रकाश येळणे, जानबा मस्के, श्रीराम बेहरे, जयराम बेहरे, ललिता बेहरे, सारिका ढोमणे, कमला ढोमणे, अनुराधा मोटघरे उपस्थित होते. कुष्ठरुग्णांना एसटी पास वाटप शिबिरनागपूर : सहायक संचालक आरोग्य सेवा नागपूरअंतर्गत नागरी कुष्ठरोग केंद्र, शांतिनगर येथे कुष्ठरुग्णांना एसटी पास सवलत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला डॉ. गरुड, रवींद्र डोळस, डॉ. एस. डब्ल्यू. मानेकर, डॉ. जी. टी. बोरकुटे उपस्थित होते. यावेळी डॉ. मानेकर यांनी शिबिरार्थ्यांना कुष्ठरोगासंदर्भात मार्गदर्शन केले. संत संमेलनाला सुरुवात नागपूर : संत श्री गुलाबराव महाराज जीवन शताब्दी महोत्सवानिमित्त हुडकेश्वर येथील रतन मैदानावर आयोजित संत संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. संमेलनात जगतगुरू शंकराचार्य स्वामी नरेंद्रनंद सरस्वती सुमेरपीठ, स्वामी परमानंद महाराज, हरिद्वार, बालसुकस्वरूप चंदनकृष्ण शास्त्री, वृंदावन मार्गदर्शन करणार आहे. गुरुजींचे जीवन राष्ट्रसमर्पित होते - श्रीधर गाडगेनागपूर : प्रभात शाखा केळीबाग रोडतर्फे गुरुजींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रा.स्व.संघाचे नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे जीवन राष्ट्रसमर्पित होते, हा देश वैभवशाली व्हावा यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.