सलमानविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यातील महत्त्वाचे दहा टप्पे

By admin | Published: January 18, 2017 01:59 PM2017-01-18T13:59:31+5:302017-01-18T14:05:15+5:30

बॉलिवुडमध्ये सलमान खान आणि वादविवाद हे एक समीकरणच बनले आहे. कसदार अभिनय आणि एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतरही

The important 10 steps in the ongoing trial of Salman | सलमानविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यातील महत्त्वाचे दहा टप्पे

सलमानविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यातील महत्त्वाचे दहा टप्पे

Next
 ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 -  बॉलिवुडमध्ये सलमान खान आणि वादविवाद हे एक समीकरणच बनले आहे. कसदार अभिनय आणि एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतरही सलमान त्याच्या अभिनयापेक्षा वादविवादांसाठीच अधिक चर्चेत असतो. कधी ऐश्वर्या रॉयसोबतचं अफेअर आणि नंतर आलेला दुरावा, तर कधी विवेक ओबेरॉय, शाहरुख खान आदींसोबतची भांडणे, तर कधी चाहत्याला केलेली मारहाण त्यामुळे विवाद आणि सलमान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरल्यात. मात्र या विवादांमध्ये मुंबईतील हीट अँड रन आणि शूटिंगदरम्यान काळवीटाची केलेली शिकार ही प्रकरणे फार गाजली. त्यातून त्याला कोर्ट कचेरीच्या फेऱ्याही घडल्या. पैकी जोधपूरमध्ये हम साथ साथ है चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान, परवाना संपलेल्या बंदुकीने काळविटाच्या केलेल्या शिकारी प्रकरणी सलमानवर सुरू असलेल्या खटल्याचा निकाल आज लागला. त्यानिमित्ताने  सलमानविरुद्धच्या या प्रकरणातील प्रमुख  मुद्यांवर  टाकलेली एक नजर. 
 1)  आर्म्स अॅक्ट खटला 1998 
जोधपूरमधील कांकाणी गावात  0.22 रायफल आणि 0.32 रिव्हॉल्व्हरचा अवैधपणे वापर करून  दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी  ऑक्टोबर 1998 रोजी पोलिसांनी सलमानविरोधात शस्त्रास्त्र कायदा कलम 325 आणि 327 अन्वये गुन्हा दाखल केला होता.  हम साथ साथ हे चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सलमानने काळविटांची शिकार केली होती, या प्रकरणात सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे हे सुद्धा सहआरोपी आहेत.   
2)  9 जानेवारीला  सुनावणी पूर्ण 
 या प्रकरणाची सुनावणी 9 जानेवारी रोजी पूर्ण झाली होती.  त्यानंतर मुख्य न्याय दंडाघिकारी दलपत सिंह राजपुरोहित यांनी खटल्याचा निकाल 18 जानेवारीपर्यंत राखून ठेवला. त्यानुसार आज या खटल्याचा निकाल सुनावण्यात आला.   
3) प्रकरणात गोवल्याचा सलमानचा दावा 
सलमानने या प्रकरणात दोन वेळा न्यायालयात आपला जबाब नोंदवला. दोन्ही वेळा दिलेल्या जबानीत त्याने आपण निर्दोष असून, वन खात्याचा अधिकाऱ्यांनी आपल्याला या प्रकरणात गोवल्याचा दावा केला. 
 4) दीर्घकाळ चालली सुनावणी
या प्रकरणाचा निकाल सुनावण्यासाठी न्यायालयाने 25 फेब्रुवारी 2014 ही तारीख निश्चित केली होती, पण त्यावेळी फिर्यादी पक्षाकडून एक  अर्ज दाखल करण्यात आला. जो 2006 साली फिर्यादी पक्षाने दाखल केला होता.  त्यानंतर या अर्जावर सुनावणी केल्याशिवाय न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देण्यास नकार दिला.  
5) काळवीट शिकार खटला 1998 
शस्त्रास्त्र खटल्यातून मुक्तता झाली असली तरी काळवीट शिकार प्रकरणी त्याच्याविरोधात सुनावणी सुरू राहणार आहे. त्यासाठी 25 जानेवारी रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश त्याला देण्यात  आले आहेत. त्यावेळी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत सुरू असलेल्या खटण्यात सलमान आणि सहआरोपी असलेल्या सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.   
6) खटल्यात आले अनेक उतार चढाव 
काळवीट शिकार प्रकरणी  सलमान खानला 2006 साली दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने हा निकाल फिरवताना निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र त्याला न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नाही असे आदेशही दिले होते.  आपल्यावरील आरोपामुळे यूकेच्या दौऱ्यावर जाता येत नसल्याचे सलमाने  न्यायालयात सांगितले. दरम्यान, 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सलमान खानबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय बाजूला करून, सलमानच्या याचिकेची नव्याने सुनावणी करण्याचे निर्देश दिले 
7) चिंकार शिकार खटला 1998  
 काळविटांच्या शिकारीबरोबरच तीन चिंकारांची शिकार केल्याप्रकरणी सलमान खानविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा कलम 51 अन्वये  1998 साली दोन वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले होते. त्यात सलमानने 26 आणि 27 सप्टेंबर 1998 दरम्यान भावाड गावात दोन चिंकारांची  आणि 28 आणि 29 सप्टेंबरदरम्यान मथानिया गावात एका चिंकाराची शिकार केल्याचा आरोप ठेवण्यात आला.   
8)  सलमानची मुक्तता, पण राजस्थान सरकारचे निर्णयाला आव्हान  
चिंकारा शिकार प्रकरणी कनिष्ठ न्यायालायाने  पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर सलमानने त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने खटल्यामधून जुलै महिन्यात सलमानची मुक्तता  केली. पण त्याविरोधात राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.  
 9)  दोन वेळा घडली तुरुंगवारी 
या खटल्यात सुनावणी सुरू झाल्यावर सलमानला 2006 आणि 2007 अशी दोनवेळा तुरूंगवारी घडली होती.  जोधपूर त्यावेळी त्याला जोधपूर तुरुंगात ठेवण्यात आले.  
10) हिट अँड रन खटला 
काऴवीट शिकार खटल्याप्रमाणेच सलमान विरुद्धचा हिट अँड रन खटलाही गाजला. मात्र डिसेंबर  2015  रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी त्याच्यावर लावण्यात आलेल्या सर्व फौजदारी आरोपातून सलमानची मुक्तता केली.  
  

 

Web Title: The important 10 steps in the ongoing trial of Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.