महत्वाचे
By admin | Published: July 31, 2015 10:25 PM2015-07-31T22:25:18+5:302015-07-31T22:25:18+5:30
अंबड औद्योगिक परिसर खड्डेमय
Next
अ बड औद्योगिक परिसर खड्डेमयनाशिक : अंबड औद्योगिक परिसरात रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून कंपनीतील कामगारांनी रस्ते सुधारण्याची मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी पथदीपही बंद असल्याची तक्रार आहे.जिजाऊ संस्थेतर्फे महिलांसाठी कार्यशाळानाशिक : गाोविंदनगर येथील जिजाऊ संस्थेतर्फे महिला सक्षमीकरण कार्यशाळेेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना उदबत्ती आणि पापड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.एमपीएमध्ये पर्यावरण शपथनाशिक : प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामकाज करताना पर्यावरणाचा विसर पडू नये यासाठी हरित कुंभ समन्वय समितीतर्फे प्रशिक्षणार्थींना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. यावेळी एक तरी झाड लावण्याच्या सूचना प्रशिक्षणार्थींना देण्यात आल्या.खडकाळी सिग्नल येथे वाहतूक पोलीस नेमावेतनाशिक : गंजमाळ येथील खडकाळी सिग्नलसाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. पोलिसांचा धाक नसल्याने सिग्नल तोेेडण्याचे आणि अपघातांचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विजेच्या लपंडावामुळे उपकरणांचे नुकसाननाशिक : महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता सातत्याने होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शहरातील बहुतांश भागात घरगुती उपकरणांमध्ये बिघाड होऊन ते निकामी झाले आहेत. महावितरणने याची दखल घेऊन सेवा सुरळीत करावी. शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूकनाशिक : शहरात शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा तसेच व्हॅनमधून अवैधरीत्या वाहतूक होत असून शालेय प्रशासन आणि पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या विचार करून गांभीर्याने याचा विचार होणे आवश्यक आहे.एसबीआय ग्राहक मेटाकुटीलानाशिक : एसबीआय बँक एटीएम केंद्रांची सुविधा सुरळीत नसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला आहे. बर्याचदा एटीएममध्ये पैसे नसल्याच्या तसेच एटीएम मशीन बंद असल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत.