(महत्त्वाचे) व्हॉट्सॲपच्या चार ॲडमिनसह नऊ जणांना अटक पंढरपुरात कारवाई : दरोडेखोर आल्याचे मेसेज केले फॉरवर्ड

By admin | Published: August 11, 2015 12:36 AM2015-08-11T00:36:36+5:302015-08-11T00:36:36+5:30

पंढरपूर : गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांमध्ये चोर, दरोडेखोर घुसल्याचा संदेश पाठवून भीती पसरविणार्‍या व्हॉट्सॲपच्या चार गु्रप ॲडमिनसह नऊ जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली़

(Important) 9 people including Whitespun staff arrested in Pandharpur: robbery forged message | (महत्त्वाचे) व्हॉट्सॲपच्या चार ॲडमिनसह नऊ जणांना अटक पंढरपुरात कारवाई : दरोडेखोर आल्याचे मेसेज केले फॉरवर्ड

(महत्त्वाचे) व्हॉट्सॲपच्या चार ॲडमिनसह नऊ जणांना अटक पंढरपुरात कारवाई : दरोडेखोर आल्याचे मेसेज केले फॉरवर्ड

Next
ढरपूर : गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांमध्ये चोर, दरोडेखोर घुसल्याचा संदेश पाठवून भीती पसरविणार्‍या व्हॉट्सॲपच्या चार गु्रप ॲडमिनसह नऊ जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली़
सोलापूर जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून रात्री चोर, दरोडेखोर येत जोरदार चर्चा गावागावांत होत आहे़ त्या भीतीने ग्रामीण भागातील लोक अख्खी रात्र जागून काढत आहेत़ व्हॉट्सॲपद्वारे फॉरवर्ड होणार्‍या संदेशामुळे या अफवा वेगाने पसरल्या़
पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ या तालुक्यात चोरट्यांच्या अफवा पसरवत काल्पनिक फोटोही अपलोड करून व्हायरल करण्याचे काम जोरात सुरू होते. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना आदेश देऊन अफवा पसरविणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. पंढरपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्यात येत असल्याचे समोर येताच सोमवारी रात्री अफवेखोर ॲडमिनच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
---------------
असे आहेत ग्रुप
विठ्ठल मंदिर परिसर, फ्रेंडशिप फॉरेव्हर, छत्रपती, मैत्री या व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन व ग्रुपमधील पाच सदस्यांवर कारवाई झाली.
----
५0 मोबाईल तपासले
पंढरपूर तालुका पोलिसांनी एका तरूणाच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्याच्याच मोबाईलवर तीन ग्रुप सापडले. त्याच आधारे तपास केला असता आणखी एक ग्रुप आढळला. दिवसभर ५0 मोबाईलची तपासणी करण्यात आली.

Web Title: (Important) 9 people including Whitespun staff arrested in Pandharpur: robbery forged message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.