महत्त्वाचे -डॉ.नरेंद्र जाधव यांची संघावर स्तुतिसुमने!
By admin | Published: April 15, 2015 12:46 AM2015-04-15T00:46:18+5:302015-04-15T00:46:18+5:30
नरेंद्र जाधव यांची संघावर स्तुतिसुमने!
Next
न ेंद्र जाधव यांची संघावर स्तुतिसुमने!म्हणाले, संघ व दलितंमधील मी दुवा रघुनाथ पांडे/नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निकटवर्ती तसेच नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर भलामण केल्याने राजकीय क्षेत्रात भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी संघ व दलित यांच्या एकीसाठी आपण कारण ठरल्यास आनंद होईल, असे विधान केले.राजधानीत एकीकडे वादग्रस्त विधानांची स्पर्धा लागली असतानाच आता जाधव यांच्या विधानाने त्यात भर पडली आहे.निमित्त होते संघ परिवारातील दोन पाक्षिकांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विशेषंकाच्या लोकार्पणाचे. मंगळवारी सीरी फोर्ट सभागृहात संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी, डॉ. नरेंद्र जाधव, पत्रकार प्रफुल केतकर, हितेश कुमार यांच्या उपस्थित हा कार्यक्र म झाला. त्यावेळी जाधव यांनी संघाला पूरक अशी आपली मते मांडल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले.जाधव म्हणाले, संघाला डॉ.आंबेडकर आधीच प्रात:स्मरणीय आहेत. बाबासाहेबांचे विचार समाजासाठी आवश्यक आहेत. ते सांगायला मी येथे आलो. माझ्या काही मित्रांना संघाच्या या कार्यक्र मात मी सहभागी होतो, असे कळल्यानंतर आपत्ती होती. परंतु चांगल्या कार्यक्र मात सहभागी होण्यासाठी मला कुणाची परवानगी लागत नाही. मी त्यांची पर्वा करत नाही. जयंतीच्या निमित्ताने संघाच्या मंचावर मी डॉ. आंबेडकर यांचे विचार सांगतो आहे, यापेक्षा चांगली गोष्ट नाही , असेही ते म्हणाले.सरकार्यवाह भैयाजी जोशी म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्याआधी १० वर्षे मदर तेरेसा यांना भारतरत्न दिले गेले; ही बाब योग्य नाही. देशात दोन डॉक्टरांनी महत्वाची भूमिका पर पाडली. दोघांनी समाजाची चिकीत्सा केली; दोघांनी समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉ.आंबेडकर संघाला पूज्य आहेत. या देशात बाबासाहेबांच्या विचारांची आजवर उपेक्षा झाली़ यापुढे संघ ते विचार तळागाळात पोहचवेल. यावेळी सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांनी बाबासाहेबांना एका वर्गापर्यंत मर्यादित ठेवणे चुकीचे आहे, असे सांगून त्यांच्या विचारांचा विस्तार करू, असे म्हटले.