शिंदे vs ठाकरे... राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वपूर्ण सुनावणीī
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 06:24 AM2023-02-14T06:24:19+5:302023-02-14T06:24:52+5:30
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी या खटल्याची सुनावणी ७ सदस्यीय घटनापीठापुढे व्हावी, अशी मागणी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर घटनापीठापुढे मंगळवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने ७ सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्याची केलेली मागणी घटनापीठापुढे मान्य होईल काय? याकडे लक्ष लागले आहे.
यापूर्वी १० जानेवारीला झालेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी या खटल्याची सुनावणी ७ सदस्यीय घटनापीठापुढे व्हावी, अशी मागणी केली होती.
या खटल्याची सुनावणी सध्या ५ सदस्यीय घटनापीठापुढे सुरू आहे. यात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्याशिवाय न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे.
या मुद्द्यांवर होणार युक्तिवाद
n मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या १६ सदस्यांना विधानसभेचे उपाध्यक्षांनी बजावलेली अपात्रतेची नोटीस, राज्यघटनेच्या अनुसूची १० मधील तरतुदींची व्याप्ती, राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाचारण करणे, विधानसभा अध्यक्षांची निवड, विधानसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोदाची निवड या वादांवर या घटनापीठापुढे दोन्ही बाजूंनी युक्तिवाद अपेक्षित आहे.