प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती, IRCTCची वेबसाईट डाऊन, तिकीट बुक करताना येताहेत अडथळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 04:31 PM2023-11-23T16:31:25+5:302023-11-23T16:31:59+5:30
IRCTC News: ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी लोकप्रिय असलेल्या IRCTC ची वेबसाइट आज काही तांत्रिक समस्यांमुळे डाऊन झाली. वेबसाईट डाऊन झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकिट बुकिंग आणि इतर संबंधित माहिती मिळवण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागला.
ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी लोकप्रिय असलेल्या IRCTC ची वेबसाइट आज काही तांत्रिक समस्यांमुळे डाऊन झाली. वेबसाईट डाऊन झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकिट बुकिंग आणि इतर संबंधित माहिती मिळवण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागला. आयआरसीटीसीने ट्विटरवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली.
आयआरसीटीसीने याबाबतची माहिती देताना सांगितले की, तांत्रिक कारणामुळे ई-तिकीट बुकिंग तात्पुरत्या स्वरूपात विस्कळीत झाली आहे. तांत्रिक टीम यावर काम करत आहे. तसेच बुकिंग लवकरच उपलब्ध करवून दिली जाईल.
आयआरसीटीची वेबसाईट सुरू केल्यावर एक मेसेज शो होत आहे. त्यात लिहिलं आहे की, मेंटेनन्स अॅक्टिव्हिटीमुळे ई-तिकिटिंग सेवा उपलब्ध नाही आहे. काही वेळानंतर प्रयत्न करा. कॅन्सलेशन/फाइल टीडीआरसाठी कृपया कस्टमर केअरला १४६४६, ०७५५-६६१०६६१ आणि ०७५५-४०९०६०० वर संपर्क साधा. किंवा etickets@irctc.co.in वर मेल करा.
याआधी २५ जुलै रोजी अशाच प्रकारच्या अडचणी समोर आल्या होत्या. त्यानंतर साईट रिस्टोअर करण्यासाठी २४ तासांची वेळ लागत होती. सर्व्हरमध्ये स्लीपर, तत्काळ बुकिंगसाठी हे अडथळे आज समोर आले आहेत.