500-1000 च्या नोटांसंदर्भात महत्वाची माहिती

By Admin | Published: November 8, 2016 10:22 PM2016-11-08T22:22:23+5:302016-11-08T22:00:08+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडील नोटा बदलता येतील.

Important information regarding 500-1000 notes | 500-1000 च्या नोटांसंदर्भात महत्वाची माहिती

500-1000 च्या नोटांसंदर्भात महत्वाची माहिती

googlenewsNext
>
ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.  10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडील नोटा बदलता येतील. पैसे जमा करताना घाई-गडबड करु नका, तुमचे पैसे तुमचेच आहेत, असा दिलासा पंतप्रधानांनी दिला. सध्या चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम (पाचशे आणि हजारच्या नोटा) बदलून घेता येतील. पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखी ओळखपत्र दाखवून नोटा बदलून मिळतील.  
 
500-1000 च्या नोटांसंदर्भात महत्वाची माहिती-
-आज मध्यरात्रीपासून 1 हजार आणि 500 रूपयांच्या नोटा  बंद
-1 हजार आणि 500 रूपयांच्या नोटा  10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत बदलता येणार
-10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत पोस्ट ऑफिस किंवा बॅंकांमध्ये 1 हजार आणि 500 रूपयांच्या नोटा  जमा करा
-10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड दाखवून नोट बदलू शकता
-चेक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे होणारे  व्यवहार सुरळीत असणार, त्यावर निर्बंध नाही
-500-1000च्या नोटांच्या सहाय्याने महत्वाच्या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंत मुदत
-रूग्णांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर 500-1000च्या नोटांवर व्यवहार करता येणार, औषधे मिळतील
-2000 च्या नव्या नोटांचा प्रस्ताव स्वीकारला आहे, 500 आणि 2000 च्या नवीन नोटा येणार
-100, 50, 20, 5, 2 आणि 1 रूपयाच्या नोटचं मोल तसंच राहणार
-दहशतवाद्यांना सीमेपलिकडून मदत मिळते, बनावट नोटांमुळे दहशतवाद्यांना मदत मिळते.
 
 

Web Title: Important information regarding 500-1000 notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.